बिग बॉस 19 चा शेवटच्या भागात बसीर अली आणि प्रणित मोरे यांच्यातील शाब्दिक वाद चांगलाच रंगला. हा वाद लवकरच वैयक्तिक स्वरूप धारण करू लागला. बसीरनं प्रणितची थट्टा करत त्याला "डॉक्टरला भेटायला जा" असं म्हटलं. त्यावर प्रणितनं प्रत्युत्तर देत 'तू हॉस्पिटलमध्ये आहेस का' असं म्हटलं.
( भार्गवचा नमस्कार अन् किंग खानने मारली मिठी, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील तो VIDEO चर्चेत )
advertisement
तू फ्लॉप कॉमेडियन
प्रणितनं पुढे बसीरला उद्देशून “तू ड्रायव्हर आहेस घराचा, सगळ्यांना सोडून येशील का?” असा सवाल केला. यावर बसीरनं त्याला "तू फ्लॉप कॉमेडियन आहेस तुझ्या घरी परत जा" असं म्हटलं. दोघांचा वाद वाढत गेला. आणि प्रणित म्हणाला, "जहाँ से भी आया हूँ, खुद के दम पे आया हूँ." बसीरनं उपहासाने "हिरो बन रहा है" असं म्हटलं. त्यावर प्रणित म्हणाला, "हाँ, हूँ मैं हिरो." यावर बसीर म्हणाला, "नहीं है तू हिरो." त्यावर प्रणितने त्याला "सस्ता अंगरेज" असं संबोधलं.
तर दुसरीकडे आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अमलनं प्रणितला "जाजू" म्हटलं. प्रणित बागेत जाऊन त्याच्या समोर जाऊन आणि विचारतो, "क्या बोल रहा है भाई? जाजू हूँ मैं?" त्यावर अमल उत्तर देतो, "हाँ, तू जाजू है." यावर प्रणित म्हणतो की तो घरात काहीतरी करत आहे, अमलपेक्षा वेगळं. "तुझ्यात खूप विष भरलं आहे. तू कमी गातोस आणि जास्त आवाज काढतोस."
प्रणितच्या या टीकेवर अमल हसत म्हणतो, "भांड्यांसोबत तुलाही धुवून टाकीन." त्यानं पुढे प्रणितच्या विनोदांची थट्टा करत म्हटलं, "तुझे जोक्स जुने झाले आहेत." त्यावर प्रणित म्हणतो, "मी तुझ्यासारखा नाही, जो पाठीमागे बोलतो."
त्यानंतर अमाल त्याच्याजवळ जाऊन त्याला टच करतो त्यावर प्रणित इशारा देतो, "मला हात लावू नकोस." पण अमाल पुन्हा स्पर्श करून म्हणतो, "तूही काही कर मग." या वादात झैशान कादरी मध्ये येऊन त्याला दूर खेचतो.
ही पहिली वेळ नाही की अमलनं प्रणितला लक्ष्य केलं आहे. याआधी एका भागात त्यानं प्रणितला "झेब्रा" म्हणत वर्णद्वेषी टीका केली आहे. मराठी माणसाला बिग बॉसच्या घरात ज्याप्रकारची वागणूक मिळत आहे त्याविरोधात बाहेर प्रणितचे फॅन्स त्याच्या सपोर्टमध्ये उतरले आहेत.
प्रेक्षक आणि सेलिब्रिटींचा रोष
घरातील अमलच्या वागण्यावर अनेक प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. Bigg Boss 7 विजेती गौहर खाननं त्याच्या वागण्याला "घृणास्पद" म्हटलं. तिनं नॅशनल टेलिव्हिजनवर बोलताना काळजीपूर्वक शब्द वापरण्याचा सल्ला दिला.
बिग बॉसच्या घरातील वाढता तणाव आणि सततच्या संघर्षामुळे येणारा वीकेंड का वार पाहण्यासारखा असणार आहे. सलमान खान घरातील कोणत्या सदस्याला फैलावर घेतो पाहणं इन्टेरेस्टिंग ठरणार आहे.