Ankita Walawalkar on Pranit More : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'बिग बॉस 19' हा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. स्पर्धक आणि त्यांच्यातील वादांमुळे हे पर्व चांगलच चर्चेत आहे. या पर्वात मराठमोळा लोकप्रिय कॉमेडियन प्रणित मोरे सहभागी झाला असून पहिल्या दिवसापासून त्याने बिग बॉसप्रेमींची मने जिंकली आहे. पण दुसरीकडे त्याला वारंवार टिकेचा सामना करावा लागत आहे. बसीर अली आणि अमाल मलिक यांनी प्रणितवर वैयक्तिक टीका केली होती. पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत प्रणितने आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे सर्व सामान्य प्रेक्षक, मराठी सेलिब्रिंटीसह अनेक इन्फ्लुएन्सर्स प्रणित मोरेला पाठिंबा देताना दिसत आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता प्रभू वालावलकरने पुन्हा एकदा प्रणित मोरेला पाठिंबा देण्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. याआधी डॅनी पंडित, निक्की तांबोळी, धनंजय पवार यांनाही प्रणितला जास्तीत जास्त व्होटिंग करण्यासंदर्भात चाहत्यांना आवाहन केलं होतं.
advertisement
अंकिता वालावलकरची पोस्ट काय?
अंकिता वालावलकर म्हणतेय,"'बिग बॉस 19'च्या पहिल्या आठवड्यात सर्व मराठी लोक प्रणितचं समर्थन करताना दिसून आले. मागील आठवड्यातही त्याला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला होता. पण 'वीकेंडच्या वार'मध्ये मात्र त्याला झिरो स्क्रीन टाइम देण्यात आलेला दिसून आला. प्रणित अजिबातच स्क्रीनवर दिसला नाही. या आठवड्यातही त्याला फार कमी दाखवण्यात येत आहे. त्यानंतर चांगला खेळ खेळत नाही, काहीच करत नाही, अशी कारणं देत त्याला घराबाहेर काढण्यात येईल. हा सगळा एडिटिंगचा खेळ मलाही माहिती आहे. त्यामुळे व्होट फॉर प्रणित...जय महाराष्ट्र".
Singer Death : 12 दिवसांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी, फेमस सिंगरचा शॉकिंग मृत्यू
अंकिता वालावलकरने याआधीही प्रणितसाठी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी कोकण हार्टेड गर्ल म्हणाली होती,"हीच ती वेळ आहे. अख्ख्या महाराष्ट्राने वोट करा. सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी...आता तर आम्हाला बघायचंच आहे की, गावी कोण परत जातंय ते...प्रणितला आतचं ठेवायचं, तो बाहेर येताच कामा नये...'बिग बॉस'च्या घरात आतमध्ये गेल्यावर काय होतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल? प्रणितची अवस्था तशीच झाली आहे. उगीच जाऊन किडे करा, मुद्दे बनवा आणि त्यावर भांडण करा, असे आपण नाही आहोत. आपल्या भावाला पाठिंबा द्या..भरपूर वोट्स करा". बसीर प्रणितला गावी जा, असं म्हणाला होता त्यानंतर अंकिताने ही पोस्ट शेअर केली होती. तसेच प्रणितने बसीरला चड्डीत राहा, अख्खं महाराष्ट्र माझं गाव आहे, असं उत्तर दिलं होतं.
'बिग बॉस 19'च्या या पर्वात दररोज नवा वाद झालेला पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. यात झीशान कादरी, अशनूर कौर, बसीर अली, प्रणित मोरे, नीलम गिरी आणि मृदुल यांना नॉमिनेट करण्यात आले आहे. या सहा स्पर्धकांपैकी या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणित मोरे येत्या दिवसांत काय स्ट्रॅटर्जी वापरणार आणि आपला खेळ आणखी उंचावर नेहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.