'या' दोन स्पर्धकांचा प्रवास संपला
'बिग बॉस 19'च्या ग्रँड फिनालेला दोन आठवडे बाकी आहेत. फिलानेला दोन आठवडे बाकी असताना दोन स्पर्धकांचा प्रवास आता संपणार आहे. सोशल मीडियावरही ही नावं ट्रेंड करत आहेत. अद्याप निर्मात्यांनी अधिकृतरित्या ही नावं जाहीर केलेली नाहीत. त्यानुसार कुनिका सदानंद आणि मालती चाहर या दोन स्पर्धकांचा प्रवास संपला असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
'बिग बॉस 19'चे अपडेट्स शेअर करणाऱ्या द खबरीनुसार, कुनिका संदानंदचा शोमधील प्रवास संपला असून मालती चाहरदेखील बाहेर पडल्याची चर्चा आहे. कारण वोटिंग ट्रेंडमध्ये मालती खूप मागे आहे. नेटकरी आता कुनिकाच्या बाहेर पडण्यावर आपला आनंद व्यक्त करत आहेत. तर काहींचं म्हणन आहे की, तान्या मित्तल आणि फरहाना भट्ट यांनी घराबाहेर जायला हवं.
सलमान घेणार अमालची शाळा
दुसरीकडे 'बिग बॉस 19'च्या या वीकेंड का वारमध्ये सलमान खान अमाल मलिकची शाळा घेताना दिसणार आहे. अमालने मागील आठवड्यात गौरवच्या कॅप्टनसीवरुन 'बिग बॉस'ला खूप सुनावलं होतं. बिग बॉस बायस्ड असल्याचं तो म्हणाला होता. तसेच शोमध्ये असणं, नसणं याबद्दल काही फरक न पडत असल्याचं तो म्हणाला होता.
