'बिग बॉस'ने दिली घरातील सर्व सदस्यांना शिक्षा
'बिग बॉस'च्या आगामी भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,"मालतीने आपल्या टेडी बियरसंबंधी हलगर्जीपणा दाखवला. तिने तो जमिनीवर फेकून दिला. त्यामुळे मी 9 नाही तर 11 राशन कमी करतोय.” हे ऐकून घरातील सर्व सदस्यांना मोठा धक्का बसतो. सर्व सदस्य मालतीला सुनवायला सुरुवात करतात. मालती म्हणते,"इतकी मोठी समस्या करण्याची गरज नाही, चुकलं तर चुकलं. मी माफी मागते.”
advertisement
मालतीने केली नेहलच्या कपड्यांवर कमेंट
मालती सॉरी बोलल्याने नेहल एक टोमणा मारते त्यामुळे मालती पुन्हा भडकते. नेहल मालतीला "बेवकूफ औरत" म्हणते. एकदा नेहल किचनमध्ये काही बोलत असताना, मालती मध्येच बोलते. तेव्हा नेहल तिला म्हणते, "मालती चाहर, मी तुझ्याशी बोलत नाही आणि मला तुझ्याशी काहीच घेणं-देणं नाही." यावर मालती उत्तर देते – 'नेक्स्ट टाइम कपडे घालून बोल माझ्याशी.'
बसीर आणि कुनिका मालतीवर भडकले
मालतीचं बोलणं ऐकताच बसीर, कुनिका आणि इतर घरचे सदस्य संतापतात. बसीर चिडून म्हणतो, "मुख्य दरवाजा उघडवतो, तू इथून बाहेर निघून जा. तू काय वेडी आहेस का? मुर्खांच्या बाजारातून आली आहेस का? समजत नसेल तर समजावलं जाईल." त्यावर मालती बसीरला म्हणते, "तू मुलींच्या वादात मध्ये येऊ नकोस." यावर बसीर उत्तर देतो,"मग तू शोमधून बाहेर निघून जा." पुढे नेहल किचनमध्ये सर्वांना सांगते की "शिरा बनवतोय आणि कोणी त्यात हस्तक्षेप करणार नाही." मालती यावर हसून म्हणते – "वाईट शिरा बनेल." हे ऐकून बसीर चिडतो आणि म्हणतो,"तू काय बोलते आहेस, हे तरी कळतंय का तुला?" या संपूर्ण प्रकरणामुळे घरात मोठा वाद निर्माण होतो. आता 'वीकेंड का वार' मध्ये सलमान खान या प्रकरणावर काय घरातील सदस्यांची कशापद्धतीने शाळा घेतोय हे पाहणं रंजक ठरेल.