'बिग बॉस 19'च्या घरात पार पडला एविक्शन टास्क
'बिग बॉस 19'च्या घरात नुकताच 'मिड वीक एविक्शन' टास्क पार पडला आहे. या आठवड्यात बेघर होण्याच्या प्रक्रियेसाठी फरहाना भट्ट, तान्या मित्तल, मालती चाहर, प्रणित मोरे आणि अमाल मलिक नॉमिनेट होते. पण नुकताच घरात एक नवा टास्क पार पडला आहे. नॉमिनेट झालेल्या सर्व स्पर्धकांना गार्डन एरियामध्ये बोलावून एक टास्क खेळला गेला.
advertisement
'या' स्पर्धकाचा प्रवास संपला
'बिग बॉस खबरी'च्या रिपोर्टनुसार, क्रिकेटर दीपक चाहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चाहरचा 'बिग बॉस 19'मधला प्रवास संपला आहे. त्यामुळे 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्याचं मालतीचं स्वप्न आता अधुरं राहिलं आहे. कमी वोट्स मिळाल्याने मालती घराबाहेर पडली आहे.
कोण आहेत TOP 5 स्पर्धक? (Bigg Boss 19 TOP 5 Contestants)
मालती चाहर घराबाहेर पडल्यानंतर 'बिग बॉस 19'च्या TOP 5 स्पर्धकांची नावे समार आली आहेत. 'टॉप 5'मध्ये तान्या मित्तल, गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे या स्पर्धकांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धकांत पुढचे 4-5 दिवस तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या पाच जणांपैकी एक जण या पर्वाचा विजेता होणार आहे.
