वोटिंग ट्रेंड काय सांगतोय?
सोशल मीडियावरील मतदान यादीत सर्वात खालच्या स्थानावर कोण आहे, म्हणजे ज्याला कमीत कमी मतं मिळत आहेत, हे तर समोर आलेच आहे. मात्र फिनालेला 2 आठवडे बाकी असताना कोण सर्वात टॉपवर आहे जाणून घ्या. 'बिग बॉस 19'च्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार, सध्या ज्याचा गेम लोकांना सर्वाधिक आवडत आहे आणि ज्याला सर्वाधिक मतं मिळत आहेत, तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे. प्रणितला तब्बल 23,392 (30%) मतं मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर गौरव खन्ना असून त्याला 20,444 (26%) मतं मिळाली आहेत. तिसऱ्या स्थानावर फरहाना भट, तर चौथ्या स्थानावर अशनूर आहे.
advertisement
प्रणित मोरेला पाठिंबा
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'मध्ये एन्ट्री केल्यानंतर अंडरडॉग म्हणून खेळत होता. पण हळूहळू त्याची भूमिका घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांनाही खूप लॉजिकल वाटू लागली. तो परत आल्यानंतरच्या आठवड्यात त्याने सलमान खानकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून आपल्या प्रतिस्पर्धी अभिषेक कुमारला थेट शोमधून बाहेर काढले. यानंतर गौरव खन्नाला ‘आपला’ म्हणून संबोधणाऱ्या प्रणितने गेल्या आठवड्यात होस्ट रोहित शेट्टी यांच्या समोर त्यांनाच धोका देत शहबाज खानचा गेम चांगला असल्याचे सांगितले. यानंतर या दोघांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळाला. मराठमोळ्या प्रणित मोरेला सोशल मीडियावर चांगला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे 'बिग बॉस 19'च्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार हे येणाऱ्या दिवसांत स्पष्ट होईल.
