TRENDING:

Sajid Khan Death Rumors : 'अरे मी जिवंत आहे...'; चादरीतून उठून निधनाच्या अफवांवर साजिद खानचा खुलासा

Last Updated:

मदर इंडिया सिनेमातील अभिनेते साजिद खान यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. डायरेक्टर साजिद खान यांनी ही माहिती मिळताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 28 डिसेंबर : एका नावाची दोन माणसं एकाच इंडस्ट्रीत काम करत असतील अनेकदा गैरसमज किंवा घोळ होण्याची शक्यता असते. समजा जर सकाळी सकाळी तुमच्या घरी तुमच्याच निधनाची बातमी ऐकून चार लोकांनी तुम्हाला फोन केले तर? तुमची काय प्रतिक्रिया असेल? सकाळी सकाळी हैराण होऊन तुमच्यावर डोक्याला हात मारायची वेळ येईल. असंच काहीस झालं आहे प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर आणि अभिनेता साजिद खान याच्याबरोबर.
डायरेक्टर साजिद खानच्या निधनाच्या अफवा
डायरेक्टर साजिद खानच्या निधनाच्या अफवा
advertisement

आज म्हणजेच 28 डिसेंबर रोजी सकाळी प्रसिद्ध अभिनेते साजिद खान यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. अनेकांना वाटलं की डायरेक्टर साजिद खान यांचं निधन झालं. निधन झालेले साजिद खान हे 1957साली आलेल्या मदर इंडिया सिनेमातील होते. पण अनेकांना बिग बॉस फेम साजिद खानचं निधन झाल्याची माहिती मिळाली आणि एकच खळबळ उडाली. आपल्या निधनाच्या अफवा ऐकून साजिद हैराण झाला. त्यानं सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत याचं खंडण केलं आहे.

advertisement

हेही वाचा - 'मदर इंडिया' फेम अभिनेत्याचं दुःखद निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

साजिद खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, साजिद एका चादरीत लपेटला आहे. हळू हळू चादर बाजूला करण्याचा तो प्रयत्न करतो आणि म्हणतो, '1957मध्ये जो सिनेमा आला होता मदर इंडिया त्यात जो छोटा मुलगा सुनिल दत्त बनला होता त्याचं नाव साजिद खान होतं. तो 1951 साली जन्माला आला. त्याच्यानंतर 20 वर्षांनी मी जन्माला आलो. त्यांचं निधन झालं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.'

advertisement

साजिद पुढे म्हणलो, ' काही बेजबाबदार मीडियावाल्यांनी त्यांच्या ऐवजी माझा फोटो लावला होता. काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत मला RIPचे मेसेज आलेत आणि मला विचारतायत की जिवंत आहेस ना? हो मी जिवंत आहे मला अजून तुमचं मनोरंजन करायचं आहे.'

मदर इंडिया सिनेमातील साजिद खान यांचं कॅन्सरमुळे निधन झालं. 22 डिसेंबर रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती उशिरा समोर आली. ‘मदर इंडिया’ नंतर ‘माया’ आणि ‘द सिंगिंग फिलिपिना’ सारख्या आंतरराष्ट्रीय सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sajid Khan Death Rumors : 'अरे मी जिवंत आहे...'; चादरीतून उठून निधनाच्या अफवांवर साजिद खानचा खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल