'मदर इंडिया' फेम अभिनेत्याचं दुःखद निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं आहे.
मुंबई, 27 डिसेंबर : बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं आहे. मेहबूब खान यांच्या मदर इंडिया या चित्रपटात सुनील दत्तच्या बिरजूची बालपणीची भूमिका साकारणारे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते साजिद खान यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्याने 'मदर इंडिया' नंतर 'माया' आणि 'द सिंगिंग फिलिपिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. कर्करोगामुळे वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
साजिद खानचा एकुलता एक मुलगा समीर याने पीटीआयला अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, साजिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 22 डिसेंबर म्हणजेच शुक्रवार रोजी त्यांचे निधन झाले. अभिनेत्याचा मुलगा समीरने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील दुसऱ्या पत्नीसोबत केरळमध्ये राहत होते. याविषयी बोलताना तो म्हणाला की, माझ्या वडिलांना राजकुमार पितांबर राणा आणि सुनीता पितांबर यांनी दत्तक घेतले होते आणि त्यांचे पालनपोषण चित्रपट निर्माता मेहबूब खान यांनी केले होते. ते काही काळ चित्रपट जगतापासून दूर राहून लोकांच्या कल्याणासाठी काम करत होते. याच काळात ते अभिनेते बऱ्याचदा केरळला जायचे. त्यामुळेच चित्रपटातील रस इथेच तो पुन्हा लग्न करून स्थायिक झाला.
advertisement
त्यांच्या मुलाने पुढे माहिती दिली की साजिद खानला केरळमधील अलप्पुझा येथील कायमकुलम टाऊन जुमा मशिदीत दफन करण्यात आले. मदर इंडियालाही ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. मेहबूब खानच्या 'सन ऑफ इंडिया'मध्ये साजिद खानने मुख्य भूमिका साकारली आहे. अमेरिकन टीव्ही शो 'द बिग व्हॅली'च्या एका एपिसोडमध्ये तो पाहुण्यांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय 'इट्स हॅपनिंग' या म्युझिक शोमध्ये तो गेस्ट जज म्हणून दिसला होता.
advertisement
साजिद खान फिलिपिन्समधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने अभिनेत्री नोरा अनोरसोबत 'द सिंगिंग फिलिपिना', 'माय फनी गर्ल' आणि 'द प्रिन्स अँड आय' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मर्चंट-आयव्हरी प्रोडक्शन 'हीट अँड डस्ट'मध्येही खानने एका डाकूची भूमिका साकारली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2023 10:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मदर इंडिया' फेम अभिनेत्याचं दुःखद निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास