कुठं लपून बसली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या शोधात मुंबई-दिल्लीत पोहोचले यूपीचे पोलीस; काय आहे प्रकरण?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
एकेकाळची प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आता माजी खासदार आणि अभिनेत्रीच्या शोधात पोलीस मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घ्या.
मुंबई, 27 डिसेंबर : एकेकाळची प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीला चेन्नई न्यायालयाने 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता अजून एक मोठी अपडेट समोर आली आहे. रामपूर पोलीस बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदाचा शोध घेत आहेत. खासदार-आमदार न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यासोबतच न्यायालयाने पोलीस अधीक्षकांना जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेशही दिले होते. आता माजी खासदार आणि अभिनेत्रीच्या शोधात पोलीस मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घ्या.
अभिनेत्री जयाप्रदा यांच्याविरोधात रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात दोन खटले सुरू आहेत. यातील एक गुन्हा केमरी येथे तर दुसरा गुन्हा स्वार पोलीस ठाण्यात सुरू आहे. दोन्ही प्रकरणे लोकसभा निवडणूक 2019 मधील आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहेत. या प्रकरणांमध्ये कोर्टात कारवाई सुरू आहे. पण जयाप्रदा मात्र कोणत्याच तारखांना कोर्टात हजर होत नाहीत. त्यांच्याविरुद्ध सहा वेळा एनबीडब्ल्यू (अजामिनपात्र) वॉरंट जारी करण्यात आले आहे. पण असं असूनही त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आता अभिनेत्रीवर कारवाई होणार आहे.
advertisement
आतापर्यंत 6 वेळा फुटलायं सलमान खानच्या ब्रेस्लेटमधील 'तो' खडा; त्यामागचं रहस्य वाचून व्हाल हैराण
न्यायालयाच्या कडक आदेशानंतर रामपूर पोलीस या अभिनेत्रीवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. रामपूर एसपींनी जयाप्रदा यांना शोधण्यासाठी एक टीम तयार केली आहे. आता पोलीस या अभिनेत्रीचा मुंबई आणि दिल्लीत शोध घेत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या सुनावणीदरम्यान जयाप्रदा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे वकील अझहर खान न्यायालयात पोहोचले होते. जयाप्रदा कोर्टात हजर नसताना वकिलाने कोर्टात रिकॉल अर्ज दाखल केला होता, पण तो फेटाळण्यात आला.
advertisement
हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. जयाप्रदा रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. यावेळी त्याच्यावर स्वार पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामध्ये आचारसंहिता लागू असतानाही त्यांनी नूरपूर गावात रस्त्याचे उद्घाटन केल्याचा आरोप आहे. याशिवाय दुसरी घटना केमारी पोलीस ठाण्यातील आहे. पिपलिया मिश्रा गावात आयोजित जाहीर सभेत जयाप्रदा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयात दोन्ही प्रकरणांची सुनावणी सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 27, 2023 5:20 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
कुठं लपून बसली 'ही' बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या शोधात मुंबई-दिल्लीत पोहोचले यूपीचे पोलीस; काय आहे प्रकरण?