फैजान अन्सारी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तान्या मित्तलने केवळ पैशांसाठी लोकांना फसविले नाही, तर शोमध्ये लोकप्रियता मिळविण्यासाठी कुटुंबाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी खोट्या सांगितल्या.या तक्रारीतून फैजानने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बलराज याला तान्याचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, फैजानचा आरोप आहे की, तान्याने बलराजलाही खोट्या प्रकरणांमध्ये अडकवून तुरुंगात पाठवले होते.
advertisement
तान्या मित्तलला अटक करण्याची मागणी
फैजान अन्सारी यांनी या सर्व गंभीर आरोपांनंतर तान्या मित्तलवर तातडीने एफआयआर दाखल करून तिला अटक करण्याची मागणी केली आहे. फैजान अन्सारी हे स्वतः एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असले तरी, प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यासाठी ते यापूर्वीही अनेकदा चर्चेत आले आहेत. फैजान यांनी यापूर्वी पूनम पांडे, राखी सावंत, उर्फी जावेद, 'बिग बॉस' विजेता एल्विश यादव आणि आशिफ मिरियाज यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.
विशेष म्हणजे, अभिनेत्री पूनम पांडेने जेव्हा कॅन्सरबद्दलची खोटी पोस्ट शेअर केली होती, तेव्हा कानपूरमध्ये फैजान यांनीच तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. फैजान अन्सारी यांच्या या तक्रारीनंतर आता तान्या मित्तल यांना कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 'बिग बॉस'मुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा हा मोठा फटका तान्याला बसल्याची चर्चा आहे.
कसा सुरू झाला तान्याचा व्यवसाय?
तान्याने सांगितलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर येथील एका खासगी शाळेत तान्या मित्तलचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या पदवीसाठी ती चंदीगड युनिव्हर्सिटीत गेली, पण हे शिक्षण अर्धवट सोडून ती पुन्हा ग्वाल्हेरला परतली. यामुळे तिचे कुटुंबीय नाराज झाले आणि तिच्यावर लग्नासाठी दबाव येऊ लागला. या काळात तान्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले. कुटुंबीयांच्या नकळत तिने कार्ड्सपासून आकर्षक भेटवस्तू बनवायला सुरुवात केली. हळूहळू ती सोशल मीडियावर सक्रिय झाली आणि तिने आपला ऑनलाइन व्यवसाय सुरू केला.
हा व्यवसाय चांगलाच यशस्वी झाला. तिच्या करिअरला मोठे वळण मिळाले ते २०१८ मध्ये, जेव्हा ती 'मिस एशिया टुरिझम' बनली. आज तिची वार्षिक अंदाजित कमाई १.५ ते २ कोटी रुपये असून, तिची एकूण अंदाजित मालमत्ता २ कोटी रुपये आहे. तिची मासिक कमाई सुमारे ६ लाख रुपये आहे.