TRENDING:

Suraj Chavan Marriage : ठरलं! सूरज चव्हाणला भेटला 'बच्चा', अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो

Last Updated:

Ankita Walawalkar Confirmed Suraj Chavan Marriage : अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच तो लग्न करणार आहे. कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने काही दिवसांआधी एका मुलीसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. पण तो खरंच लग्न करतोय की कोणत्या प्रोजेक्टचा भाग आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण काही महिन्यांआधीच देखील एका व्हिडीओनिमित्तानं सूरज चव्हाणनं रील बायको दिसली होती. पण यावेळी सूरजनं शेअर केलेला फोटो मात्र खरा असल्याचं दिसतंय. गोलीगत सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून त्याच्या बिग बॉसमधील बहिणीनेच ही बातमी कन्फर्म केली आहे.
News18
News18
advertisement

सूरज चव्हाणला त्याच्या आयुष्यातील बच्च कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर सूरजला त्याची लाइफ पार्टनर भेटली असून लवकरच तो लग्न करणार आहे. सूरजची बिग बॉसच्या घरातील त्याची बहिण म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिने लग्नाची बातमी कन्फर्म केली आहे. अंकिता नुकतीच सूरज चव्हाणला भेटण्यासाठी त्याच्या घरी म्हणजेच बारामतीला गेली होती. तिथे त्याने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या बायकोची भेट घेतली. तिच्याबरोबरचा फोटो शेअर केलेत. अंकिताच्या कॅप्शनवरून सूरजचं लग्न ठरण्याचं कन्फर्म झालं आहे.

advertisement

( Priya Bapat : दुसरी पण मुलगीच! प्रिया बापटच्या जन्मावेळी नाराज झाली आजी, लेकीसाठी वडिलांनी लढवली भन्नाट शक्कल )

अंकिताने सूरज चव्हणच्या नव्या घराबाहेरचे फोटो शेअर केलेत. तिने एका मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने तिला मिठी मारली आहे. पण तिचा चेहरा लपवून त्यावर हार्ट इमोजी लावला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, सूरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येण शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट. या फोटोसोबत अंकिताने बँड बाजा वरात घोडा हे गाणं सुद्धा लावलं आहे. यावरून सूरज चव्हाणचं लग्न ठरलं असून तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं क्लिअर झालं आहे.

advertisement

सूरज चव्हाणने काही दिवसांआधी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगी दिसतेय. दोघांनी साऊथ इंडियन लुक केला आहे. पण मुलीने चेहऱ्यावर हात ठेवल्याने तिचा चेहरा दिसत नाही. त्यानंतर सूरज चव्हाणने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यातही ती मुलगी पाठमोरी उभी असल्याचं दिसतंय. त्यानंतर सूरज तिच्या खांद्यावर हात ठेवताना दिसतोय.

advertisement

आता सूरज चव्हाणच्या आयुष्यातील त्याची बच्चा आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. दरम्यान बिग बॉस जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणचं घर बनवण्यासाठी त्याला मदत केली. सूरजचं घर तयार होत असून त्याचं काम पूर्ण होत आलं आहे. लवकरच सूरज चव्हाण नव्या घरात त्याच्या बायकोचं स्वागत करताना दिसणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Suraj Chavan Marriage : ठरलं! सूरज चव्हाणला भेटला 'बच्चा', अंकिताने शेअर केला वहिनीसोबतचा फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल