TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : लय भारी! तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल इतकं क्युट बिग बॉस

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बॉस मराठीच्या घरात शाळा भरलेली दिसते आहे. सगळे सदस्य विद्यार्थी बनले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
बिग बॉस म्हणजे भांडणं, वाद, एकमेकांवर कुरघोडी... पण आता बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच काहीतरी वेगळं दिसलं आहे. इतकं की प्रेक्षकांना बिग बॉस खूप क्युट वाटू लागलं आहे.  बिग बॉस मराठी 6 च्या घरात शाळा भरली आहे. बिग बॉसमधील सदस्य चक्क शाळेला निघाले आहेत.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात बिग बॉस मराठीच्या घरात शाळा भरलेली दिसते आहे. सगळे सदस्य विद्यार्थी बनले आहेत. शाळेचा युनिफॉर्म घालून तयार झाले आहेत आणि शाळेत येऊन मजामस्ती करताना दिसत आहेत.

'माझ्याकडे खरंच पैसे नव्हते', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पैशांसाठी मागावी लागली भीक

advertisement

प्रोमोच्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला राकेश प्रभूला उचलून घेऊन येताना दिसतो. त्यानंतर सागर पावडर आणि काजळाचे टिळे लावून येतो. गालावर आणि कपाळावर त्याने काजळ लावली आहे. लहानपणी आई जशी आपल्या मुलांना अगदी शाळेत तयार करून पाठवायची अगदी तसंच तो तयार होऊ आला आहे. "माझ्या आईने मेकअप केला आहे", असं म्हणत तो येताना दिसतो. त्याला पाहताच क्षणी हसू फुटतं.

advertisement

यानंतर अनुश्री सहाचा पाढा बोलताना दिसते आणि ती चुकते. त्यानंतर विशालकडे बोट दाखवत राखी रुचिताला म्हणते, "तो मला आवडतो आहे" यावर रुचिता तिला म्हणते, "मॉन्ट्या माझा आहे" आणि विशालसह सगळे खदखदून हसतात. शेवटी सागर बोलतो, "बिग बॉस तुमचा आशीर्वाद आहे". यावर बिग बॉस म्हणतात, "आशीर्वादपर्यंत ठिक आहे, वाद नको"

तन्वी-रुचिताच्या आवाजाला कंटाळात! बिग बॉसच्या या स्पर्धकाचा आवाज ऐकून सलमान खानने केलेला मांजरेकरांना फोन

advertisement

बिग बॉसचा हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना हा एपिसोड पाहण्याची उत्सुकता अधिकच आहे. प्रेक्षकांना सदस्यांचा हा विद्यार्थी लूक खूप आवडला आहे. विशेषत: सागर आणि राखीच्या लूकचं सगळ्यांना कौतुक केलं आहे. राखी लय भारी दिसते, अशी कमेंट एका युझरने केली आहे. तसंच राकेशही क्युट दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर करणला दाढीवाला विद्यार्थी असं म्हटलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी, पण चालवतात ‘5 स्टार रिक्षा’, Video पाहाल तर आवाक् व्हाल
सर्व पहा

तुम्हाला बिग बॉसच्या घरातील ही शाळा आणि विद्यार्थी कसे वाटले, तुम्हाला कोणता विद्यार्थी आवडला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : लय भारी! तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल इतकं क्युट बिग बॉस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल