advertisement

तन्वी-रुचिताच्या आवाजाला कंटाळात! बिग बॉसच्या या स्पर्धकाचा आवाज ऐकून सलमान खानने केलेला मांजरेकरांना फोन

Last Updated:

तन्वी कोलते आणि रुचिता जामदारचा आवाज काय घेऊन बसलात. बिग बॉसमधील एका स्पर्धकाचा आवाज ऐकून सलमान खानने महेश मांजरेकरांना फोन केला होता. नेमकं काय झालेलं?

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात सध्या भांडणं, वाद आणि विशेषतः काही स्पर्धकांचा मोठा आवाज यामुळे हा सीझन गाजतो आहे. विशेष करून तन्वी आणि रुचिता यांच्या कचाकचा भांडणांनी प्रेक्षकांचं अक्षरश: डोकं उठवलं आहे. तन्वी एकदा बोलायला लागली की थांबत नाही आणि रुचिता बोलायला लागली की अपशब्द बोलते आणि त्यामुळे प्रेक्षक तिच्यावर वैतागतात.
भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशुमखनं तन्वी कोलते किती बोलते! असं सुनावलं होतं. तर रुचिता बोलायला लागली की प्रेक्षक आवाज म्युट करतात, असंही सांगितलं होतं. रितेशनं हे सांगितल्यानंतर दोघींनी त्यांच्यात काहीही सुधारणा केलेली नाही. त्यामुळे प्रेक्षक अजूनही त्यांना वैतागलेले आहेत. घरातील सदस्यांपासून ते प्रेक्षकांपर्यंत अनेक जण त्यांच्या आवाजाला कंटाळल्याचं सोशल मीडियावर बोलत आहेत.
advertisement
पण तुम्ही तन्वी आणि रुचिताचं काय घेऊन बसलात, यापूर्वीही बिग बॉसच्या घरात एका स्पर्धकाचा आवाज एवढा गाजला होता की थेट सलमान खानने तेव्हाचे होस्ट महेश मांजरेकर यांना फोन केला होता. ती स्पर्धक म्हणजेच तृप्ती देसाई. त्या बिग बॉस मराठी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या.
advertisement
तृप्ती देसाईंनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हा किस्सा सांगितला. त्यांनी लिहिलं की, "बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून सलमान खान यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता."
advertisement
तृप्ती यांनी बिग बॉसच्या चावडीचा व्हिडीओ देखील शेअर केला  आहे. महेश मांजरेकर म्हणाले होते, "सलमानचा फोन आला मला. त्यांच्या सेटवरचे सगळे कॉन्टेस्टंट सकाळी कोणाला चहा द्यायचा आहे असं विचारत होते. कोणाचे पाय चेपायचे आहेत कोणाचं काय करायचं आहे. सलमान म्हणाला, हे लोक पागल झालेत का? त्याने सांगितलं की, आदेश येतायत एका बाईचे, मोठ मोठ्याने. चहा कुठेय माझा, हे कुठेय माझं... तृप्ती तुमचा आवाज ऐकून तिकडच्या सेटवरचे काम करत होते. कारण इथे बाजूलाच आहे ना तो सेट.
advertisement
तृप्ती देसाई म्हणाल्या, "हो सर गेला असेल. मला हुकूमशाहची पदवी मिळाल्यामुळे माझा आवाज मला त्या पट्टीत ठेवता आला." मांजरेकर म्हणाले, "हुकूमशाह म्हणजे आरडा ओरडा नाही ना. तो हुकुम क्या शाह झाला." दरम्यान महेश मांजरेकर यांनी हा संपूर्ण सीन मिश्किलमध्ये सांगितला होता.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तन्वी-रुचिताच्या आवाजाला कंटाळात! बिग बॉसच्या या स्पर्धकाचा आवाज ऐकून सलमान खानने केलेला मांजरेकरांना फोन
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement