'क्युंकी सास भी कभी बहू थी' मध्ये एक असा कॅमिओ दाखवण्यात येणार आहे ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये, तुलसी तिच्या लॅपटॉपवर कोणाला तरी भेटून आनंदी झाल्याचं पाहायला मिळतंय. समोरून फक्त एक आवाज येत आहे. आता हा पाहुणा कोण अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे. हा पाहुणा परदेशी आहे हे मात्र नक्की. अखेर मालिकेत कॉमियो करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव समोर आलं आहे.
advertisement
शोमध्ये बिल गेट्सचा कॅमिओ
शोमध्ये स्मृती इराणीला व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती दुसरी कोणी ही मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स आहेत. शोमध्ये तुलसी म्हणजेच स्मृती इराणी, बिल गेट्स यांना व्हिडिओ कॉल करताना दिसणार. स्मृती इराणी यांनी CNBC TV18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली.
ऐतिहासिक क्षण - स्मृती इराणी
याविषयी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, "भारतीय मनोरंजनातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे. बऱ्याच काळापासून मुख्य प्रवाहातील संभाषणांमध्ये महिला आणि मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे पाऊल ते बदलण्याच्या दिशेने एक शक्तिशाली पाऊल आहे."
'द बिग बँग थिअरी' मध्ये ते दिसले होते त्याचीही प्रचंड चर्चा झाली होती. आता 'क्योंकी सास भी कभी बहू थी' हा भारतीय टेलिव्हिजनसाठी एक ऐतिहासिक क्षण असेल. जागतिक आयकॉनने एका घरगुती डेली सोपवर बिल गेट्स यांची हजेरी लागणार आहे. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' च्या निमित्तानं भारतीय टेलिव्हिजन एक ठराविक सीमा पार करून जागतिक पॉप संस्कृतीत सहभागी होत असल्याचं म्हटलं जात आहे. सीमा तोडत आहे आणि जागतिक पॉप संस्कृतीच्या चर्चेत सामील होत आहे हे देखील दर्शवेल.
