सिद्धार्थ कन्ननच्या मुलाखतीत बॉबी डार्लिंगनं तिच्या आयुष्यातील अनेक भावनिक आणि वेदनादायक गोष्टी उघड केल्या. ती म्हणाली, “कधी काळी मी बँकेत काम करत होते, पण स्वप्नं मोठी होती म्हणून सेंट्रल बँकेची नोकरी सोडली. सुरुवातीला सिनेमात चांगलं काम मिळालं, पण नंतर सर्वकाही थांबलं. मी अक्षरशः कपिल शर्मा आणि एकता कपूरच्या पायावर पडले, काम मागितलं.”
advertisement
35 रुपये रोजावर काम करणारे नाना पाटेकर आज कोट्यवधींचे मालक, किती आहे नेटवर्थ?
बॉबी म्हणते, “कपिल शर्मा जेव्हा मोठा स्टार नव्हता, तेव्हा तो माझं नाव घेऊन स्टेजवर जोक्स करायचा. पण आता त्यानेच मला काम देणं बंद केलं. मी त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज केला, लिहिलं, मी तुझ्या पाया पडते, मला छोटंसं पात्र दे. मला अभिनय करायचा आहे, भिक नको, काम पाहिजे.” पण कपिलकडून काहीच उत्तर मिळालं नाही.
फक्त कपिलच नाही, तर एकता कपूरलाही बॉबीनं कामासाठी विनवण्या केल्या. “मी 'क्या कूल हैं हम' सारखा हिट चित्रपट तुमच्यासोबत केला. बालाजी माझ्यासाठी घरासारखं आहे. मी आत्महत्येचा विचार करतेय, इतकं नैराश्य आलंय. मला कोणीतरी संधी द्यावी, इतकीच विनंती आहे,” असं तिने सांगितलं.
तिच्या म्हणण्यानुसार, बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार तिच्या शैलीची नक्कल करत आज स्टार बनले आहेत. “ते माझा गेटअप घेऊन लोकांना हसवत आहेत आणि माझ्यावरच पोटावर लाथ मारत आहेत. हे फार वेदनादायक आहे,” आज बॉबी डार्लिंग मुंबईत परतली आहे. ती पुन्हा एकदा नव्या उमेदीनं उभी राहू इच्छिते. तिचं म्हणणं आहे “मी अजूनही अभिनय करू शकते. मला अजून खूप काही द्यायचं आहे. फक्त एक संधी हवी आहे.”