Nana Patekar: 35 रुपये रोजावर काम करणारे नाना पाटेकर आज कोट्यवधींचे मालक, किती आहे नेटवर्थ?

Last Updated:
Nana Patekar Networth : बॉलिवूडमध्ये अशी काही नावं आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर झोपडीतून राजवाड्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यापैकी एक म्हणजे आपल्या ताठ मानेच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले नाना पाटेकर.
1/7
बॉलिवूडमध्ये अशी काही नावं आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर झोपडीतून राजवाड्यापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यापैकी एक म्हणजे आपल्या ताठ मानेच्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले नाना पाटेकर.

advertisement
2/7
नाना पाटेकरांनी मेहनतीच्या जोरावर, अभिनयाच्या कौशल्यावर आज मनोरंजनसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. आज ते कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत मात्र कधी काळी ते 35 रुपये रोजावर काम करायचे.

3/7
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात झाला. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर.लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, पण गरिबीमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

4/7
शिक्षणानंतर नानांनी आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्यावेळी झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचे काम केले. चित्रपट पोस्टर रंगवणे, जाहिराती तयार करणे अशी लहान-मोठी कामं त्यांनी केली. त्यावेळी त्यांना केवळ 35 रुपये रोज मिळायचे.

5/7
हळूहळू नानांनी थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मग सिनेमाकडे वळले. नानांचा अभिनय अधिकच रांगडा आणि वास्तविक वाटतो. त्यांच्या बोलण्यात असलेली ताकद, डोळ्यांतील भाव आणि संवादफेक प्रेक्षकांच्या काळजाला भिडते.

6/7
‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘अब तक छप्पन’ या चित्रपटांनी त्यांना सुपरस्टार बनवलं. ‘क्रांतिवीर’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्यांचे ‘वेलकम’ मधील ‘उदय भाऊ’ हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे.

7/7
आज नाना पाटेकर एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये फी घेतात. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 80 कोटी आहे. पण एवढ्या श्रीमंतीतही ते फार साधं आणि माणुसकीनं जगतात. नानांचं सामाजिक कार्यही तितकंच प्रभावी आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाउंडेशन’ स्थापन केलं असून, मराठवाडा, विदर्भातील अनेक गावांमध्ये त्यांनी मदतीचं काम केलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement