TRENDING:

'या' चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येणार बॉबी, सनी आणि धर्मेंद्र? बॉबी देओलने दिली मोठी अपडेट

Last Updated:

अ‍ॅनिमल नंतर बॉबीच्या नव्या सिनेमाची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाविषयी त्याने स्वतःच मोठी अपडेट दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 15 ऑक्टोबर :  बॉबी देओल इंडस्ट्रीतील नवाजलेला अभिनेता आहे. त्याने आपल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. बॉबी सध्या त्याच्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टिझर समोर आला असून बॉबी त्यात एका खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं दिसत आहे. याआधी बॉबीने 'आश्रम' या वेब सिरीजमध्येही अशाच प्रकारची भूमिका साकारली होती. आता अ‍ॅनिमल नंतर बॉबीच्या नव्या सिनेमाची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाविषयी त्याने स्वतःच मोठी अपडेट दिली आहे.
बॉबी, सनी आणि धर्मेंद्र
बॉबी, सनी आणि धर्मेंद्र
advertisement

'आश्रम' मधील बाबा निरालाच्या भूमिकेनंतर बॉबीचं खूप कौतुक झालं. या भूमिकेसाठी बॉबी देओलच्या झालेल्या कौतुकाने हे सिद्ध झाले की, तो कुठल्याही प्रकारची नकारात्मक भूमिका सहज साकारू शकतो. आता चित्रपट निर्मातेही त्याला अशाच प्रकारच्या भूमिका देऊ करत आहेत. लवकरच तो रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Deepika Padukone : आरारारा खतरनाक! हातात बंदूक, डोक्याला जखम; लेडी सिंघम बनून दीपिका करणार राडा

advertisement

अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बॉबी देओलने त्याच्या आगामी चित्रपटाविषयी मोठी अपडेट दिली आहे. 'यमला पगला दीवाना' किंवा 'अपने' या चित्रपटात प्रेक्षकांना देओल कुटुंबाला एकत्र पाहायला आवडलं, त्यामुळे भविष्यात तुम्ही तिघेही पुन्हा एकत्र कधी दिसणार? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. याला उत्तर देताना बॉबी म्हणाला की, 'अपने 2 बनवण्याचा आणि शक्य तितक्या अशा प्रकारच्या चित्रपटांवर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या फक्त 'अपने 2'च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे, जेव्हा स्क्रिप्ट चांगली बनेल तेव्हा आम्ही पुन्हा एकत्र दिसणार आहोत.' असं बॉबी म्हणाला आहे.

advertisement

2007 मध्ये रिलीज झालेल्या 'अपने ' या स्पोर्ट्स ड्रामावर आधारित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यानंतर 'यमला पगला दीवाना'मधून हे तिघेही पुन्हा एकदा पडद्यावर आले आणि खळबळ उडवून दिली. पण त्याच्या 'यमला पगला दीवाना 2' आणि 'यमला पगला दीवाना फिर से' या दोन सिक्वेलमध्ये तिघांनीही प्रेक्षकांना खूश करण्याचा प्रयत्न केला पण सिक्वेलमध्ये ते प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले नाहीत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रेस्टॉरंटसारखी लागेल चवं, घरीच बनवा झणझणीत बांगडा फ्राय, रेसिपीचा Video
सर्व पहा

बॉबी देओल बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसला नाही. त्यानंतर त्याने 'रेस 3'मधून पुनरागमन केले आणि दुसऱ्या डावातही चाहत्यांची मने जिंकली. आता तो वेब सिरीजमध्ये नशीब आजमावत आहे.त्याची आधीची आश्रम ही मालिका हिट झाली होती. आता लवकरच तो रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटातही दिसणार आहे, ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'या' चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येणार बॉबी, सनी आणि धर्मेंद्र? बॉबी देओलने दिली मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल