बॉलिवूडचा स्टार अभिनेता अजय देवगण याने आपल्या दारु पिण्याच्या सवयीवर वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला आहे की, "मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो, मी कधीच काही लपवत नाही. मी पूर्वी खूप दारु प्यायचो. ज्यांनी कधीच दारु प्यायली नाही त्यांना हे सांगायचे आहे. जे लोक लिमीटमध्ये दारु पितात त्यांना दारु व्यसन ठीक आहे. मला दारु सोडायची होती म्हणून मी वेलनेस स्पा मध्ये गेलो आणि जास्त प्रमाणात प्यायचो ते बंद केले."
advertisement
पुढे तो म्हणाला की, "मी पिण्यावरुन माझा दृष्टीकोण बदलला आहे. मी त्यावेळी माल्ट प्यायचो नाही. पण आता मी माल्ट घेतो. माझ्यासाठी ती दारु नाही. मला स्वतःला शांत राहण्यासाठी आणि माझा थकवा दूर करण्यासाठी तो माल्ट घेणे माझ्या रुटीनचा भाग आहे. तुम्ही ती जेवताना 30 ते 60 मिली पिऊ शकता. मी पित असताना त्याची मर्यादा पार केली नाही."
'द रणवीर शो' मध्ये बोलताना अभिनेता म्हणाला होता की, "मी कितीही प्यायलो तरी मला दारु चढत नाही. मी 14 वर्षाचा असल्यापासून दारु पित आहे. ही एक अशी गोष्ट आहे ती नंतर त्याची सलय लागते. मला दारु सोडणे खूप कठीण गेले होते.
अजय देवगनचा 'दे दे प्यार दे 2' चित्रपट आता लवकरच येत आहे. त्याचे दिग्दर्शन हे अंशुल शर्मा यांना केले आहे. अजय सोबत रकुल प्रीत सिंह आणि आशीष मेहराही दिसणार आहेत
