Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये दिवाळीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीनंतर आता रमेश तौरानी यांच्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या पार्टीत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र, सर्वाधिक चर्चेत आहे अभिनेत्री श्रिया सरन आणि तिचा पती आंद्रेई कोशचीव यांचा एक रोमँटिक व्हिडिओ. यामध्ये अभिनेत्री पतीला किस करताना दिसत आहे. हे जोडपं 15 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत झालेल्या रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हजर होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम व्यक्त केलं.
advertisement
श्रिया सरनने पतीसोबत केला लिप लॉक
मुंबईत निर्माता रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत श्रिया सरन तिचा पती आंद्रेईसोबत स्टायलिश अंदाजात स्पॉट झाली. या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. पण ‘दृश्यम’ फेम श्रिया सरनने कॅमेऱ्यासमोर पतीसोबत लिप लॉक करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. दिवाळी पार्टीतील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
श्रियाने यावेळी सोनेरी रंगाची साडी नेसली होती तर तिच्या पतीने काळ्या रंगाचा कुर्ता-पायजामा घातला होता. या रोमँटिक कपलच्या अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय आणि चाहतेही त्यांच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
'या' स्टार्सचाही दिसला ग्लॅमरस अंदाज
बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी ऋतिक रोशन आणि सबा आझाद हेदेखील या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले. दोघांनी हातात हात घालून स्टायलिश अंदाजात एन्ट्री घेतली. ऋतिकने काळ्या रंगाचा साटनचा शर्ट आणि मॅचिंग ट्राउझर परिधान केला होता, तर सबा गोल्डन-बेज रंगाच्या भरजरी शरारा सेटमध्ये सुंदर दिसत होती. तिचा लूक प्रेक्षकांना फारच भावला.
'या' कपलचा फेस्टिव्ह लूक व्हायरल
बॉलीवूडमधील आणखी एक लोकप्रिय जोडी पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी एकत्र पोझ देत सर्वांचं लक्ष वेधलं. पुलकितने इंडो-वेस्टर्न आउटफिट परिधान केला होता, तर क्रितीने ऑफ-व्हाईट साडी आणि डीप नेक डिझायनर ब्लाउजमध्ये सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हा तिच्या पती जहीर इक्बालसोबत या पार्टीत हजर होती आणि त्यांचा फेस्टिव्ह लूक सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.