TRENDING:

15 व्या वर्षी नाकारला सलमानचा सिनेमा, आता बॉलिवूडला दिला 800 कोटींचा चित्रपट, कोण ही बॉलिवूड अभिनेत्री कोण?

Last Updated:

Actress Rejected Film Of Salman Khan : या बॉलिवूड अभिनेत्रीने चक्क भाईजान सलमान खानचा चित्रपट नाकारला होता. तिने स्वतःच एका मुलाखतीमध्ये हे कबूल केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ही एक प्रसिध्द अभिनेत्री जी सध्या बॉलिवूडवरती राज्य करत आहे. तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची कमाल दाखवली आहे. या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीने चक्क महानायक अमिताभ यांच्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. दुसरे आश्चर्य हे की तिने सलमान खानच्या चित्रपटाला नकार दिला होता.
श्रद्धा कपूरची मोठी घोषणा
श्रद्धा कपूरची मोठी घोषणा
advertisement

या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव म्हणजे श्रद्धा कपूर. तिचे वडिलही चांगले प्रसिद्ध अभिनेते आहेत. श्रध्दाने करियरमध्ये बॉक्स ऑफिसवर 800 कोटी रुपये कलेक्शन जमवलेला चित्रपट दिला आहे. तिला बॉलिवूडमध्ये आता 15 वर्षे पुर्ण झाली आहेत. पण तिने भाईजान सलमान खानचा चित्रपट का नाकारला ? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Bigg Boss 19 चा लेटेस्ट व्होटिंग ट्रेंड समोर, हा स्पर्धक कोरणार ट्रॉफीवर नाव?

advertisement

15 व्या वर्षी सलमानच्या चित्रपटाला नकार

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही आपल्या बोल्ड अंदाजामुळे कायमच चर्चेत असते. तिचा जन्म हा मुंबईत 23 मार्च 1987 मध्ये झाला होता. तिच्या वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेता सलमान खानचा चित्रपट ऑफर झाला होता. त्या चित्रपटाचे नाव होते 'लकी:नो टाइम फॉर लव'. तो 2005 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात सलमानच्या विरुद्ध स्नेहा उल्लालने काम केले होते. पण त्याअगोदर ही ऑफर श्रद्धाला मिळाली होती.

advertisement

एका मुलाखतीमध्ये श्रद्धा कपूर म्हणाली की, "या चित्रपटाची मला ऑफर मिळाली होती. पण माझा अभ्यास आणि वय लहान असल्याने मी या सलमानच्या चित्रपटाला नकार दिला होता. मी खूप लहान होती. अभ्यास करुन मला कॉलेज करायचे होते."

800 कोटी गल्ला जमवलेला चित्रपट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बॅगेत सापडलेले 10 लाख रुपये परत दिले, महिलेचं उत्तर ऐकून तुम्ही कराल कौतुक
सर्व पहा

श्रद्धा कपूरने 'तीन पत्ती' चित्रपटातून डेब्यू केले होते. पण खरी ओळख तिला 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' या चित्रपटाने दिली होती. त्यानंतर 2018 मध्ये आलेल्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाने तिच्या फिल्मी करियरला चार चांद लागले. 2024 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने 588 कोटी रुपये गल्ला जमवून इतिहास रचला होता. या चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन हे 857 कोटी रुपये एवढे झाले.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
15 व्या वर्षी नाकारला सलमानचा सिनेमा, आता बॉलिवूडला दिला 800 कोटींचा चित्रपट, कोण ही बॉलिवूड अभिनेत्री कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल