...म्हणून बॅगेत सापडलेले 10 लाख रुपये परत दिले, कचरा वेचक महिलेचं उत्तर ऐकून तुम्ही कराल कौतुक, Video

Last Updated:

कचरा गोळा करणाऱ्या अंजू माने यांना 20 नोव्हेंबरला कचरा गोळा करत असताना 10 लाख रुपये सापडले. अंजू माने यांनी कोणतीही लालसा न बाळगता ते 10 लाख रुपये ज्या व्यक्तीचे होते त्या व्यक्तीला परत दिले.

+
कचरा

कचरा गोळा करणाऱ्या महिलेने रस्त्यावर सापडलेले 10 लाख केले परत 

पुणे : आपल्या समाजात आजही प्रामाणिकपणा शिल्लक आहे, याचं उत्तम उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. कचरा वेचक अंजू माने 20 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे कचरा वेचत असताना त्यांना पैशाने भरलेली 10 लाख रुपयांची बॅग सापडली. पण अंजू माने यांनी कोणतीही लालसा न बाळगता ते 10 लाख रुपये ज्या व्यक्तीचे होते त्या व्यक्तीला परत दिले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पुण्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. या सगळ्याविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अंजू माने यांनी सांगितलं की, गेल्या 20 वर्षांपासून त्या कचरा वेचण्याचं काम करत आहेत. 20 नोव्हेंबरला त्या नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ परिसरात कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा कचरा वेचत असताना रस्त्याच्या कडेला एक बॅग दिसली. त्यांना वाटलं, कुणीतरी कचरा किंवा औषधांच्या बाटल्या टाकून दिल्या असतील, म्हणून त्यांनी ती बॅग उचलून आणली. मात्र बॅग जड असल्यामुळे त्यांनी ती उघडून पाहिली आणि त्यामध्ये तब्बल 10 लाख रुपये होते.
advertisement
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बॅग मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बॅग मालकाचा शोध घेत असतानाच रस्त्याला एक अस्वस्थ अवस्थेत माणूस काहीतरी शोधत होता. त्या व्यक्तीची 10 लाख रुपये असलेली बॅग हरवल्याचे समजले. एवढी मोठी रक्कम गमावल्याने ती व्यक्ती घाबरून गेली होती, त्यांना बोलताही येत नव्हते. अंजु माने यांनी त्या व्यक्तीला पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून 10 लाख रक्कम त्यांना परत दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल साडीसह रोख रक्कम देत त्यांचा सत्कारही करण्यात आला. सर्वत्रच त्यांच्या प्रामाणिक पणाचं कौतुक केलं जातं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
...म्हणून बॅगेत सापडलेले 10 लाख रुपये परत दिले, कचरा वेचक महिलेचं उत्तर ऐकून तुम्ही कराल कौतुक, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement