मुंबईतल्या अंधेरीत रासायनिक गळती, एकाचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mumbai Andheri Gas Leak: अंधेरीतील तीन मंजिला परिसरातील एका इमारतीत रासायनिक गळती झाली.
मुंबई : मुंबईतल्या अंधेरीत रासायनिक गळती झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून श्वसनाशी संबंधित त्रासामुळे तिघांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून तिघांवर उपचार सुरू आहे.
अंधेरीतील तीन मंजिला परिसरातील एका इमारतीत रासायनिक गळती झाली. शनिवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रासायनिक गळतीचे वृत्त समजल्यावर अग्रिशन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या.
रासायनिक गळतीच्या घटनेत एकाचा दुर्दैवी अंत झाल्याचे वृत्त असून तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणते रसायन होते, हे अद्याप कळू शकलेले नाही. एनडीआरएफच्या टीमला अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:20 PM IST


