IDBI Bank विकायला काढली, खरेदी करण्यास पाहा कोण उत्सुक; Insider Report मध्ये मोठा खुलासा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IDBI Bank Stake Sale: आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेत कोटक महिंद्रा बँकेने मोठी हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. सरकार 2026 पर्यंत 61% हिस्सा विकण्याच्या तयारीत असून, लवकरच अंतिम आर्थिक बोली मागवण्यात येतील.
मुंबई: आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणाचे प्रयत्न बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. आता एका मीडिया रिपोर्टनुसार, देशातील एक प्रमुख खाजगी बँक कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) देखील यात मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या शर्यतीत सामील झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, ओकट्री कॅपिटल (Oaktree Capital) आणि फेअरफॅक्स (Fairfax) यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांव्यतिरिक्त आता कोटक महिंद्रा बँकेनेही यात मोठे स्वारस्य दाखवले आहे.
advertisement
या संदर्भात कोटक महिंद्रा बँकेने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही, तसेच त्यांनी याचा इन्कारही केलेला नाही. IDBI बँकेच्या खाजगीकरणामधील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा अडथळा म्हणजे त्याचे मोठे बाजार भांडवल (Market Cap) आहे. 1 लाख कोटींहून अधिक बाजार भांडवल असल्यामुळे कोणत्याही मोठ्या गुंतवणूकदाराला बँकेची 60% हिस्सेदारी खरेदी करणे कठीण जात आहे. मात्र या आव्हानावर मात करण्यासाठी कोटक महिंद्रा बँक 'इक्विटी करन्सी'चा फायदा घेऊन 'पार्ट-इक्विटी, पार्ट-कॅश विलीनीकरण (Merger) डील' करण्याचा विचार करू शकते, असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
advertisement
केंद्र सरकारने वित्तीय वर्ष 2026 च्या अखेरीस आयडीबीआय बँकेचे खाजगीकरण पूर्ण करण्याची योजना आखली आहे. सध्या या बँकेमध्ये भारत सरकारची 45.48% आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीची 49.24% हिस्सेदारी आहे. सरकारने 'गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग' (DIPAM) कडे आयडीबीआय बँकेतील एकूण 61% हिस्सा विकण्याचे काम सोपवले आहे.
advertisement
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार दीपम सचिवांनी सांगितले आहे की, बँकेच्या हिस्सा विक्रीची 'ड्यू डिलिजन्स' (योग्य ती तपासणी) प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता डिसेंबरपर्यंत आर्थिक बोली (Financial Bids) मागवण्याची योजना आहे. आयडीबीआय बँकेतील सरकारी हिस्सा विकण्याची योजना सर्वात प्रथम 2022 मध्ये जाहीर झाली होती.
advertisement
बँकेच्या शेअर्सच्या स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास 13 जानेवारी 2025 रोजी 65.89 या एका वर्षातील नीच पातळीवर असलेला हा शेअर नऊ महिन्यांतच 62.38% ने उसळी घेऊन 31 ऑक्टोबर 2025 रोजी 106.99 या विक्रमी उच्च पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबर 2025 तिमाहीच्या समभागधारणेच्या नमुन्यानुसार बँकेमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी 94.71% आहे, तर सार्वजनिक समभागधारकांची हिस्सेदारी 5.29% आहे. या 5.29% मध्ये सुमारे 6,80,203 किरकोळ गुंतवणूकदारांची 2.11% हिस्सेदारी समाविष्ट आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 22, 2025 8:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
IDBI Bank विकायला काढली, खरेदी करण्यास पाहा कोण उत्सुक; Insider Report मध्ये मोठा खुलासा


