TRENDING:

सुष्मिता सेनचा पहिला बॉयफ्रेंड कोण? ज्याने जिंकवून दिला होता 'मिस युनिवर्स'चा किताब

Last Updated:

Sushmita Sen: सुष्मिता सेनच्या बॉयफ्रेंडने तिला मिस युनिवर्स होण्यासाठी खूप मोलाची साथ दिली होती. तिच्या संकट काळात तो मदतीला आला होता. मिस युनिवर्स ट्रेनिंगला तो जॉब सोडून तिच्या सोबत गेला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यातील ही एक बॉलिवूडची मिस युनिवर्स किताब जिंकलेली अभिनेत्री. तिने आपला इंडस्ट्रीमध्ये प्रवास कसा सुरु केला आणि त्यात तिला कोणी साथ दिली ज्यामुळे ती मिस युनिवर्स, आणि अभिनय क्षेत्रात आली. या बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव आहे सुष्मिता सेन. तिने तिच्या पहिल्या बॉयफ्रेंड विषयी एका मूलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
News18
News18
advertisement

सुष्मिता सेनच्या प्रेमाची गोष्ट एका फिल्मी कथेसारखीच आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव सांगितले आहे. त्याचे तोंडभरुन कौतूक केले आहे. तिने जेव्हा मिस युनिवर्स किताब जिंकला, तेव्हा तिने आपल्या बॉयफ्रेंडला अख्ख्या जगासमोर आणले होते. कारण त्याची साथ असल्यामुळे ती हा किताब जिंकू शकली. म्हणजे प्रेमाची ताकद कुठे पोहचवू शकते हे यावरुन लक्षात येते.तिच्या बॉयफ्रेंडचे नाव होते रजत तारा. त्याने तिच्यासाठी किती कष्ट केले होते ते तिने सांगितले आहेत.

advertisement

फारुख शेखच्या टॉक शो 'जीना इसी का नाम है' मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड रजतची ओळख करुन दिली होती. ती म्हणाली, "मी एक खूप महत्वाचे तुम्हाला सांगणार आहे. हा माझा पहिला बॉयफ्रेंड आहे रजत. माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती. कारण जेव्हा मी मिस इंडिया जिंकली होती तेव्हा मला मिस युनिवर्सच्या ट्र्रेनिंगला मुंबईला जायचे होते. मी खूप घाबरले होते. मुंबई म्हणजे मला एक विदेश वाटत होते. कारण मी लहानाची मोठी दिल्लीमध्ये झाली होती. मी रडकुंडीला आले होती, मला मुबंईला जायचे नव्हते. मला मिस युनिवर्स नको आहे. मला एकटे एकटे काही करायचे नाहीये.

advertisement

ती पुढे म्हणाली,  "रजत माझ्या या संकट काळात आणि द्विधा मनस्थितीमध्ये पुढे आला होता. त्यावेळी रजत हा बेनटेन साठी काम करत होता. त्याने माझ्या आईला सांगितले की ही तयार होणार नाही काकू. त्याने त्यावेळी ऑफिस मधून सुट्टी घेतली होती. पण त्याला सुट्टी मिळाली नाही. त्याला कामावरुन काढण्यात आले. रजत माझ्यासोबत मुंबईला आला. त्याच्यामुळे मी मिस युनिवर्स किताब जिंकू शकले."

advertisement

सध्या हे दोघं एकत्र दिसत नाही, काय घडले नेमके

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा आणि मोमोज, फक्त 70 रुपयांपासून घ्या आस्वाद, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

सुष्मिता सेन 'मिड डे' ला मूलाखत देताना स्पष्ट म्हणाली, "मी रजतला सोडले नाहीये. अशा व्यक्तीला मी सोडू शकत नाही. कधी कधी जीवनात आपण एकमेकांच्या पुढे जात असतो. मी त्याला सोडले नाही फक्त आम्ही आपआपल्या मार्गाने गेलो आहोत. रजत माझ्या आयुष्यात कायम असेल. मी खूप आनंदी आहे की रजत सारखा बॉयफ्रेंड माझ्या आयुष्यात आला."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सुष्मिता सेनचा पहिला बॉयफ्रेंड कोण? ज्याने जिंकवून दिला होता 'मिस युनिवर्स'चा किताब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल