उद्धट म्हणत लोकांनी केले ट्रोल
इशित भट्ट गुजरातचा असून, तो पाचवीत शिकतो. 'केबीसी १७' चा तो विशेष एपिसोड प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली. लोकांनी त्याच्या संस्कारांवर आणि ओव्हर-कॉन्फिडन्सवर प्रश्नचिन्ह उभे केले. या टीकेनंतर, इशित भट्टने अखेर सार्वजनिकरित्या अमिताभ बच्चन यांच्याशी केलेल्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे.
पॅप्ससमोर रकुल प्रीतसोबत घडला Oops Moment! सर्वांसमोरच तोंडावर बसली मुलाची लाथ, VIDEO VIRAL
advertisement
इशितच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात तो नम्रपणे अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती करताना आणि बिग बी लगेच ती इच्छा पूर्ण करताना दिसत आहेत.
मी चुकलो...
या व्हिडिओसोबत एक भावूक नोटदेखील लिहिण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, "नमस्ते सगळ्यांना, 'कौन बनेगा करोडपती'वर माझ्या वर्तनाबद्दल मी मनापासून माफी मागतो. माझ्या बोलण्याने अनेकांना दुखावले, निराशा झाली किंवा अपमान वाटला, हे मला माहीत आहे. मला खरंच वाईट वाटत आहे. त्यावेळी मी खूप 'नर्वस' झालो होतो आणि त्यामुळे माझं वागणं पूर्णपणे चुकीचं ठरलं. माझा हेतू असभ्य असण्याचा नव्हता. मी अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण केबीसी टीमचा मनापासून आदर करतो."
"वचन देतो, यापुढे नम्र राहीन"
इशितने या घटनेतून मोठा धडा शिकल्याचे सांगितले. त्याने लिहिले, "शब्द आणि वर्तन आपल्याला कसं दाखवतं, हा मोठा धडा मी शिकलो आहे, विशेषतः अशा मोठ्या मंचावर. मी वचन देतो की, भविष्यात मी नम्रता आणि आदराने वागेन."
इशितने या कठीण काळात त्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले. एका युजरने त्याला पाठिंबा देत लिहिले, "तो एक लहान मुलगा आहे, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने माफी मागितली. मित्रांनो, कोणाच्याही बालपणाला आघाताचे कारण बनवू नका."