दरम्यान एक प्राइव्हेट डिटेक्टिव तान्या पुरी यांनी एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडमधील एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअरवर भाष्य केलं. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांची अफेअर्स असल्याचं तिने सांगितलं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत तान्याने सांगितलं, "एका अभिनेत्याच्या पत्नीच्या मॅनेजरने आमच्याशी संपर्क केला होता आणि नवऱ्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितलं. तेव्हा कळलं की तो अभिनेता आपल्या पत्नीशी प्रामाणिक नव्हता. त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशन होते."
advertisement
( नीलम कोठारी नाही, गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर! बायको सुनिता म्हणाली, 'मी जेव्हा रंगेहात...' )
तान्या पुढे म्हणाली, "बॉलिवूडमध्ये अनेक एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्सच्या केसेस होतात पण लोक यावर बोलत नाही. सगळ्यांना आपली परफेक्ट इमेज दाखवायची असते. मी अशा एका कपलबद्दल बोलत आहे ज्यांनी 2000 च्या सुरूवातीला लग्न केलं. नवरा खुलेआम चीट करायचा. त्याने अनेक तरूण अभिनेत्रींसोबत होता. बायकोला नवऱ्याच्या सगळ्या सवयी माहिती होत्या पण तिने अनेकदा त्याकडे कानाडोळा केला. पण गोष्ट जेव्हा मुलांपर्यंत पोहोचली तेव्हा तिने मोठं पाऊल उचललं."
"त्या अभिनेत्याला दोन मोठी मुलं होती, जे इंडस्ट्रीत आहेत. सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे वडील काय करतात. पण कॅमेरासमोर ते परफेक्ट कपल असल्यासारखे वागतात. पत्नी चांगली शिकलेली आहे आणि नवरा देसी मुंडा आहे. दोघेही ऑनस्क्रिन चांगली काम करतात. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीचे अनेक महिलांबरोबर संबंध आहेत", असंही तान्याने सांगितलं.
तान्याने पुढे धक्कादायक गोष्ट सांगितली ती म्हणजे, "त्या अभिनेत्यानं अनेक अभिनेत्रींची मदत करून बदल्यात आपल्या इच्छा पूर्ण करून घेतल्या. पत्नी नवऱ्याशी या सगळ्यावर जेव्हा बोलली तेव्हा त्याने सगळं कबूल केलं. त्याने सांगितलं की त्याचा स्वभाव आधीच बदलला होता. तो अशा ठिकाणी प्रवास करायचा जिथे फिल्मचं शूटींग व्हायचं नाही. त्याच्या बोलण्यात गडबड व्हायला लागली आणि त्यामुळेच त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने आम्हाला हायर केलं. पत्नीने 20 वर्षांनी हे पाऊल उचललं कारण तिच्या मुलांना सगळं समजलं होतं."
"त्या पत्नीसाठी इमोशनल चिटींग फिजिकल चिटींगपेक्षा जास्त हैराण करणारी होती. ती त्याला अनेकदा माफ करत राहिली पण अखेर तिचा संय सुटला. तिच्या नवऱ्याने मुलांसाठी बदलायचं वचन दिलं. डिटेक्टिव्ह तान्यने या सगळ्यात त्या अभिनेत्याचं कुठेच नाव घेतलं नाही."
