ऑक्टोबर 2023 मध्ये 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम ऑफ एअर करण्यात आला. ढासळत चाललेल्या टीआरपीमुळे हा शो बंद करण्यात आला असं म्हटलं गेलं. डॉ. निलेश साबळे हा शो होस्ट करत होता. शो संपल्यानंतर त्याने शो बंद करण्यामागची अनेक कारणे देखील सांगितली.
advertisement
'चला हवा येऊ द्या' हा शो बंद झाल्यानंतर निलेश साबळे आणि टीम 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या कलर्स मराठीच्या शोमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा शो देखील 'हवा येऊ द्या' कार्यक्रमाच्याच पॅटर्नमध्ये तयार करण्यात आला होता. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनमुळे तीन महिन्यात या शोने गाशा गुंडाळला होता.
'चला हवा येऊ द्या' पुन्हा सुरू होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेले असताना अभिनेता कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांचे काही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. कुशलने दोघांचे फोटो शेअर केलेत. या फोटोमध्ये कुशल आणि श्रेया ब्लॅक कलरच्या कॉस्च्युममध्ये असून एका व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर उभे आहेत. व्हॅनिटी व्हॅनवर दोघांची नावे लिहिलेली आहेत. 'बॅक टू बेसिक', असं कॅप्शन देत कुशलने झी मराठीचं इन्स्टा पेज मेन्शन केलं आह. त्याचबरोबर #शूटडे असा हॅशटॅगही शेअर केला आहे.
कुशलच्या या पोस्टनंतर दोघे 'चला हवा येऊ द्या'चं शूटिंग करत आहेत असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. कुशलच्या पोस्टवर अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट करत लिहिलंय, "ब्लॅक टू बेसिकपण चालेल." अभिजीत खांडकेकरने हार्ट इमोजी शेअर केलेत. तर एका चाहत्याने लिहिलंय, "तुम्ही सर्वांनी चला हवा येऊ द्या सारख्या गोष्टीकडे परत यावे अशी आमची इच्छा आहे".