TRENDING:

'मेडिकल'मधून कंडोम आणायला... नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा, VIDEO

Last Updated:

Sonakshi Sinha on Kajol Twinkle Khanna Show : ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा 'टू मच' हा चॅट शो लोकप्रिय होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्यात भारतीय लोकांच्या कंडोम खरेदी करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी सोनाक्षी सिन्हाने असे काही विचारले की काजोलला आपलं हसू आवरता आलं नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sonakshi Sinha on Kajol Twinkle Khanna Show : अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्न यांचा 'टू मच' हा चॅट शो सध्या प्रचंड गाजत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी सहभागी होतात. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या कार्यक्रमात पाहुणे म्हणून येतात. या शोच्या सहाव्या भागात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पाहुणे म्हणून आले. सध्या या विशेष भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण कंडोम खरेदी करण्याबाबतच्या भारतीय मानसिकतेवर चर्चा करताना दिसत आहेत. 'टू मच' या चॅट शोमध्ये एक सेगमेंट असा असतो की ज्यात पाहुण्यांना चर्चा करण्यासाठी एक विषय दिला जातो. जर ते त्या विषयाच्या बाजूने असतील. तर ते त्या अँगलने त्यांचे मत मांडतात आणि जर विरोधात असतील तर त्याबाजूने बोलतात.
News18
News18
advertisement

सोनाक्षी सिन्हा आणि मनीष मल्होत्रा असलेल्या भागात या विशेष भागात,"भारतीय लोक फेअरनेस क्रीम खरेदी करण्यापेक्षा कंडोम खरेदी करताना अधिक लाजतात" या विषयावर चर्चा झाली. या विषयाला ट्विंकल खन्ना आणि मनीष मल्होत्रा समर्थन दिले नाही, तर सोनाक्षी सिन्हा आणि काजोल यांचा असा विश्वास होता की कंडोम खरेदी करताना भारतीय लोक लाजतात.

advertisement

काजोल म्हणते,"लोकांना लाज वाटते. फेअरनेस क्रीम खरेदी करण्यासाठी गेलात, तर सहज सांगतात की 'ती शाहरुख खान वाली क्रीम द्या". पण कंडोम खरेदी करताना लाज वाटते. म्हणतात,"माझा मित्र आणून देईल". यावर मनीष मल्होत्रा म्हणाला की असे काही नाही. भारत बदलला आहे. ट्विंकल खन्ना यांनीही मनीषला समर्थन दिलं. तेव्हा काजोल म्हणाली,"तुम किती वेळा मेडिकल स्टोअरमध्ये गेली आहेस?". त्यावर अभिनेत्री म्हणते,"मी सॅनेटरी पॅड्ससाठी जाईल, पण कंडोमसाठी नाही. ते दुसरं कोणाचं तरी डिपार्टमेंट आहे".

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
सर्व पहा

मनीष मल्होत्रा पुढे म्हणतो की भारत बदलला आहे आणि कंडोम खरेदी करताना कोणालाही कसली भीती वाटत नाही. त्यावर सोनाक्षी सिन्हा विचारते,"असं असेल तर मग आपली लोकसंख्या इतकी का आहे?". हे ऐकून काजोल हसते. सोनाक्षी पुढे म्हणते की," यावरून स्पष्ट होते की बहुतेक लोक कंडोम खरेदी करत नाहीत. त्यावर मनीष मल्होत्रा म्हणतो की,"माझ्या मते असे काही नाही".

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
'मेडिकल'मधून कंडोम आणायला... नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल