दारा सिंहसोबत काम करायला कोणी तयार का नव्हतं?
1960 च्या दशकात दारा सिंह सलग चित्रपट करत होते. एकदा तर एकाचवेळी थिएटरमध्ये त्यांचे 12 चित्रपट रिलीज झाले होते. त्यावेळी मुमताजचा करिअरसाठी संघर्ष सुरू होता. करिअरच्या संघर्षादरम्यान मुमताजची भेट दारा सिंहसोबत झाली. त्यावेळी ती 15 वर्षांची होती. तर दारा सिंह 35 वर्षांचे होते. पण वयाच्या 15 व्या वर्षी मुमताज 35 वर्षांच्या दाराची नायिका झाली. याबद्दल मुमजात म्हणालेली," कोणतीही नामवंत अभिनेत्री त्यावेळी मुमताज यांच्यासोबत काम करू इच्छित नव्हती कारण त्यांना ‘B-ग्रेड’चा ठप्पा बसण्याची भीती होती". पण मुमताज मात्र आनंदाने दारा यांच्यासोबत काम करण्यास तयार झाली.
advertisement
मुमताजने 2012 मध्ये Rediff ला सांगितलं होतं,"त्या काळात आम्ही केलेले चित्रपट B-ग्रेड मानले जायचे. मी एकटीच अभिनेत्री होती जी त्यांच्यासोबत काम करायला तयार झाली. कारण त्या काळात कोणताही मोठा हिरो माझ्यासोबत काम करायला तयार नव्हता. या चित्रपटांत माझ्याकडे फारसं करण्यासारखं नसायचं, कारण सर्व काही त्यांच्यावरच केंद्रीत असायचं.”
मुमताज पुढे म्हणाली,"दारा सिंह एक मोठे कलाकार असूनही त्यांच्याकडे कधीच गांभीर्याने पाहिलं गेलं नाही". मुमताज आणि दारा सिंह यांनी सिकंदर-ए-आझम, रुस्तम-ए-हिंद, आणि डाकू मंगल सिंह सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं.
मुमताजला दारा सिंहसोबत काम केल्यावर किती मानधन मिळायचं?
मुमताजने सांगितलं की, त्या काळात दारा सिंह आणि ती सर्वाधिक पैसे मिळवणारे B-ग्रेड कलाकार बनले होते. दारा सिंह यांना प्रत्येक चित्रपटासाठी 4 लाख रुपये मिळायचे आणि मुमताजला 2.5 लाख रुपये मिळायचे. याबाबत बोलताना मुमताज म्हणालेली,"माझी भूमिका खूपच छोटी असायची. काही रोमँटिक सीन आणि काही गाणी असत. मला आजही आठवतं, मला 2.5 लाख रुपये मिळायचे आणि त्या काळात ही रक्कम फार मोठी मानली जायची".
