अभिनेता धर्मेंद्र यांचा हा बंगला जगभरात सनी व्हिला म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबईच्या जुहू परिसरात हा आलिशान बंगला आहे.हा बंगला 50 वर्षे जुना असून देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या त्यात एकत्र राहिल्या आहेत. त्यामुळेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर धर्मेंद्र यांनी अखेरचे क्षणी देखील या बंगल्यातच नेले होते.
'ही-मॅन'च्या कठोर परिश्रमाची कहाणी
धर्मेंद्रचे जुहू येथील घर हे त्याच्या संघर्षाचे आणि यशाचे प्रतिक मानले जात. एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र मुंबईत आले आणि त्यांना एका साध्या गॅरेजमध्ये राहण्यासाठी जागा मिळाली. पण नंतर त्याला मिळालेल्या यशामुळे त्यांनी हे आलिशान घर खरेदी केले आहे. बॉबी देओलने स्वतः सांगितले आहे की त्याचे घर 50 वर्षे जुने आहे. धर्मेंद्र यांनी ही मालमत्ता १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला खरेदी केली होती. त्यावेळी जुहूमध्ये घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या नव्हत्या. कारण बहुतेक कलाकार वांद्रे किंवा शहरातील भागात राहत होते. धर्मेंद्र यांनी ही जमीन दूरदृष्टीने खरेदी केली. त्यावेळच्या गुंतवणुकीच्या तुलनेत आज त्यांची गुंतवणूक हजारो पटीने वाढली आहे. आज जुहू परिसर हा मुंबईतील सर्वात आलिशान आणि महागड्या परिसरापैकी एक मानला जातो. 2024- 25 च्या रिअल इस्टेट मार्केट आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याचे सध्याचे बाजार मूल्य 80 ते 100 कोटी आहे. "सनी व्हिला" ही केवळ प्रॉपर्टी नाही, तर ती देओल कुटुंबाचे "घर" आहे, जिथे तीन पिढ्या एकत्र राहतात. बॉबी देओलने स्वतः खुलासा केला आहे की तो या घरात त्याची पत्नी तान्या, त्याचा मोठा भाऊ सनी देओल, त्याची पत्नी पुजा आणि कुटुंबासह, त्याचा काका आणि चुलत भाऊ यांच्यासह राहतो. धरम पाजी मुंबईत असताना ते देखील त्यांच्या या घरी राहतात.
advertisement
नातवाचे लग्न देखील याच बंगल्यात
सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलच्या लग्नाच्या काही विधीही या घराच्या अंगणात पार पडल्या. धर्मेंद्र यांचे चाहते त्याच्या अनेक वाढदिवसांना या घराबाहेर जमतात. धर्मेंद्रच्या मुंबईतील घराचे इंटेरिअर हे बॉबी देओलची पत्नी तान्या देओलने डिझाइन केले आहे. हे घर आधुनिकता आणि परंपरेचे सुंदर मिश्रण आहे, लाकडी फरशी आणि मोठे काचेचे दरवाजे आहेत. जुहूच्या सर्वात महागड्या भागात असून ते तरी या घरात प्राॉपर पंजाबी
वाईब्स येतात.
बंगल्यात एक मोठी बाग
मुंबईच्या काँक्रीटच्या जंगलात धर्मेंद्रच्या बंगल्यात एक भव्य, प्रशस्त बाग आहे. धर्मेंद्र यांचे शेतीवरील प्रेम हे लपलेले नाही. ते जेव्हा जेव्हा मुंबईत असायचे तेव्हा ते अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या बागेची झलक शेअर करत असे. हे बाग त्याच्या जुहूतील घराला शहराच्या गजबजाटापासून दूर एका शांत फार्महाऊसची अनुभूती देते.
धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. अनेक अफवाही पसरलेल्या. अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र दिग्दर्शक करण जोहर यांनी पोस्ट केली आहे. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत
