या चर्चेत अचानक एका अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे. ‘Dhurandhar 2’च्या क्लायमॅक्स सीनमध्ये रणवीर सिंह चार्टर्ड प्लेनमध्ये बसताना काही क्षणांसाठी एक एअर होस्टेस दिसते. हा सीन स्क्रीनवर अवघ्या 1 सेकंदासाठी दिसतो. मात्र याच छोट्याशा उपस्थितीमुळे अभिनेत्री नियती पारीख रातोरात चर्चेत आली आहे. या सीनमध्ये तिचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. पण ती क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय. ही मिस्ट्री गर्ल कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता.
advertisement
नियती पारीखने स्वतःच तिचा हा सीन सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "धुरंधर 2 मध्ये मला कोणी कोणी पाहिलं?" अनेकांनी तिचा सीन शोधण्यासाठी पुन्हा सिनेमा पाहिला. क्लिप व्हायरल होताच काही युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'मेन रोल तर तुमचाच होता', '10 रुपये मिळाले की 1000?' अशा कमेंट्स करत अनेकांनी तिची खिल्ली उडवली. मात्र दुसरीकडे अनेकांनी तिचं कौतुकही केलं.
नियतीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कळतंय ती एक सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिला 2500 लोक फॉलो करतात. ती सोशल मीडियावरबरोबर अभिनय देखील करते. तिच्या अकाऊंटवर धुरंधर सिनेमातील अनेक कलाकारांबरोबरचे फोटो देखील आहेत.
