सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांच्या कन्येने बार्बराचे नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. तिने चक्क 100 टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा नावलौकिक केला आहे. तिने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या सर्वच विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत, जे एक दुर्मीळ आणि उल्लेखनीय यश आहे.
advertisement
बार्बरा नामजोशीने दहावीच्या परीक्षेतील 100 टक्के मिळवले. हे यश केवळ कौतुकास्पदच नव्हे, तर प्रेरणादायी आहे. तिच्या या भव्य यशाबद्दल शाळेतर्फे आणि मित्र-मैत्रिणींकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. अनेक मान्यवरांनी आणि चित्रपट क्षेत्रातील सहकाऱ्यांनीही नामजोशी कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भले शब्बास...! अभ्यास असावा तर असा, प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या लेकीची भरारी, दहावीत मिळवले 100 टक्के गुण