Virat-Anushka : प्रेमानंद महाराजांच्या भेटीपेक्षा अनुष्का-विराटच्या अंगठीची जास्त चर्चा, नेमकी कसली आहे ही 'हायटेक' अंगठी?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Virat kohli-Anushka Sharma Electronic Ring:कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली खूप चर्चेत आहे. अशातच विराट आणि अनुष्काविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. अशातच विराट आणि अनुष्का नुकतेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले.
मुंबई : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली खूप चर्चेत आहे. अशातच विराट आणि अनुष्काविषयी अनेक बातम्या समोर येत आहेत. अशातच विराट आणि अनुष्का नुकतेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले. या भेटीदरम्यानचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओदरम्यान एका अंगठीने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
प्रेमानंद महाराजांच्या भेटीदरम्यान अनुष्काने काळा-पांढरा साधा सूट घातला होता, तर विराटने हलका पँट-शर्ट. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, आणि डोळ्यांत समाधानाचा तेज पहायला मिळाला. या भेटीदरम्यान सर्वांचे लक्ष वेधून घेतले विराट आणि अनुष्काच्या हातातील गुलाबी रंगाची इलेक्ट्रॉनिक अंगठीने. ही गुलाबी अंगठी नेमकी कशासाठी आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
advertisement
हातात 'ती' खास गुलाबी अंगठी!
ही अंगठी होती डिजिटल टॅली काउंटर रिंग, जी देवाचे नाव घेताना मंत्रजप मोजण्यासाठी वापरली जाते. विराटने ती अंगठी सहजपणे दाखवली, तर अनुष्का ती थोडीशी लपवत असल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले.
अनुष्काला भावनांचा बांध फुटला
प्रेमानंद महाराजांचे प्रवचन सुरू असताना, एक क्षण असा आला की महाराजांनी अनुष्काला विचारले, "तू आनंदी आहेस का?" आणि या प्रश्नाने अनुष्काच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या क्षणाचे कॅप्चर झालेले दृश्य आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ती क्षणभर रडली, पण तिच्या चेहऱ्यावर असलेली भावनिक शांतता सगळ्यांच्या मनाला भिडली.
advertisement
Virat Kohli & Anushka Sharma से पूज्य महाराज जी की क्या वार्तालाप हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/7IWWjIfJHB
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) May 13, 2025
मंत्र, ध्यान, साधना आणि आत्मचिंतनाचा प्रवास या वाटेवर सध्या विराट अनुष्का चालले आहेत. हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील एक नवा टप्पा आहे. या भेटीदरम्यान दोघांनीही कोणताही गाजावाजा टाळला. ना सिक्युरिटीचा फौजफाटा, ना स्टाईलचा गाजावाजा. या दोघांचे साधे वागणे, नम्रपणा आणि भक्तिभावाने नतमस्तक होणे हे पाहून चाहत्यांच्या मनात या जोडीबद्दलचे प्रेम आणखीनच वाढले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 13, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Virat-Anushka : प्रेमानंद महाराजांच्या भेटीपेक्षा अनुष्का-विराटच्या अंगठीची जास्त चर्चा, नेमकी कसली आहे ही 'हायटेक' अंगठी?