शाहरुख खानच्या 'मन्नत' मध्ये गेल्यानंतरच अनुभव कसा होता याविषयी बोलताना विक्रम कोचरने सांगितलं की, शाहरुखने त्याला आपल्या घरी बोलावले होते. पण मन्नत मध्ये पाऊल ठेवताच मन्नतचे दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला होता. याविषयी बोलताना तो म्हणाला की, ''जेव्हा शाहरुख खान यांनी प्रथम आम्हाला त्यांच्या मुंबईच्या घरी ‘मन्नत’मध्ये बोलावलं तेव्हा आम्ही सगळे त्यांचं घर पाहून थक्कच झालो. आम्ही एका लिफ्टमधून त्यांच्या घरात गेलो, तिथे प्रचंड सिक्युरिटी होती. तिथे एक मोठा हॉल आहे, प्रवेशद्वाराजवळ मोठी लॉबी आहे आणि तिथून पुढे विमानतळावर ज्या पद्धतीची सुरक्षा यंत्रणा असते तशी तिथे आहे. एकदा तुम्ही आत शिरलात की प्रत्येक गोष्ट तपासली जाते.''
advertisement
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या स्टारकास्टसोबत दिसली दयाबेन; लवकरच मालिकेत करणार एंट्री?
पुढे मुलाखतीत विक्रम कोचरने शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता याविषयी खुलासा केला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, ' 'शाहरुख खान एक खूप चांगला माणूस आहे, जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत चित्रपट शूट करता तेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्टारसोबत काम करत आहात असं ते भासवु देत नाहीत. शाहरुख खान सगळ्यांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकतात तसेच शूटिंगदरम्यान वेळोवेळी स्वतःच्या सूचना देखील देत असतात.
शाहरुख खानच्या घराबद्दल सांगायचं तर, मन्नतची किंमत 200 कोटी रुपये आहे. यात बॉक्सिंग रिंग, टेनिस कोर्ट, बेडरूमसह अनेक आकर्षक गोष्टींचा समावेश आहे. त्याने पत्नीसोबत मिळून हे घर विकत घेतलं होतं.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' विषयी सांगायचं तर, नुकतंच चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून लोकांनी चांगला प्रतिसाद याला दिला आहे. पहिल्या दिवशी सुमारे १ कोटी लोकांनी या चित्रपटाचं ऍडव्हान्स बुकिंग केलं आहे. त्यामुळे पठाण आणि जवान नंतर 'डंकी' सुद्धा ब्लॉकबस्टर होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. या चित्रपटात शाहरुख आणि तापसीबरोबरच विक्रम कोचर हा अभिनेतासुद्धा महत्त्वाच्या अन् अत्यंत विनोदी भूमिकेत पाहायला मिळत आहे.