Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या स्टारकास्टसोबत दिसली दयाबेन; लवकरच मालिकेत करणार एंट्री?
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे कलाकार मात्र एका खास कारणामुळं एकत्र आले आहेत. यावेळी दयाबेन देखील उपस्थित होती.
मुंबई, 18 डिसेंबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही प्रसिद्ध मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेली 15 वर्षे मनोरंजनाच्या दुनियेत गाजलेल्या या शोमधील 'दयाबेन' हे पात्र पाहण्यासाठी प्रेक्षकांचे डोळे आसुसलेले आहेत. काही दिवसांपूर्वी दयाबेन मालिकेत परतणार असल्याची चर्चा होती. पण ती न आल्याने प्रेक्षकांची निराशा झाली आणि प्रेक्षकांनी या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. पण तेव्हाच, निर्मात्यांनी जानेवारीमध्ये हे पात्र परत मालिकेत येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. या सगळ्या दरम्यान, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे कलाकार मात्र एका खास कारणामुळं एकत्र आले आहेत. यावेळी दयाबेन देखील उपस्थित होती.
जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांच्या मुलाचं नुकतंच लग्न पार पडलं. तेव्हा सगळे कलाकार जमले होते पण दयाबेनने सगळ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. दिशा वकानीचा शोच्या कलाकारांसोबतचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्री शोमध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
advertisement
अभिनेत्री दिशा वकानीने २०१७ मध्ये 'तारक मेहता...' शो सोडला. तेव्हापासून आजपर्यंत चाहते त्याला परत पाहण्यासाठी आसुसले आहेत. तिच्या पुनरागमनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शोच्या लीड कास्टसोबत अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होत आहे. पलक सिंधवानी, नितेश भालुनी, अंबिका रांजणकर, शुनैना फौजदार आणि इतर काही जणांसोबत तिचे क्लिक केलेले फोटो आहेत. या फोटोमध्ये दिशा वकानीची मुलगीही दिसत आहे.
advertisement
अभिनेत्रीचा हा फोटो 'जेठालाल'ची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नातील आहे. पलक सिंधवानीने इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने दिशा वकानीसोबत क्लिक केलेला फोटोही शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी निर्माते असित मोदी यांनी सर्वांच्या आवडत्या दयाभाभीला लवकरच परत आणले जाईल, असा व्हिडिओ जारी केला होता. ते म्हणाले होते, "काही परिस्थिती अशी निर्माण झाली की, दयाभाभींना या दिवाळीत आम्ही गोकुळधाम सोसायटीत आणू शकलो नाही. पण आता काही दिवसातच ती या शोमध्ये परतणार आहे.' असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्यानंतर दिशा वकानी आता स्टारकास्टसोबत दिसत असल्याने तिला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
advertisement
व्हायरल झालेल्या लग्नाच्या फंक्शनच्या फोटोंमध्ये दिशा गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. दिशा वकानीची गोंडस मुलगीही तिच्यासोबत पोज देताना दिसत आहे. दिशा वकानी गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधून गायब असल्याची माहिती आहे. या शोमध्ये ती दिलीप जोशी यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. शोमध्ये दिलीप आणि दिशाच्या मुलाचे नाव टपू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2023 7:29 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या स्टारकास्टसोबत दिसली दयाबेन; लवकरच मालिकेत करणार एंट्री?


