advertisement

ऐश्वर्या अभिषेक मधील दुराव्याला सासूबाईच जबाबदार? 'या' कारणामुळं ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आल्या जया बच्चन

Last Updated:

आराध्या एक टॅलेंटेड स्टार कीड असून तिला लवकरच बॉलिवूडमध्ये पाहायचं असल्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. आराध्याचे आजोबा म्हणजे बिग बिंनीसुद्धा आपल्या नातीच कौतुक केलं आहे. पण आता तिच्या आजीची म्हणजे जया बच्चन यांची सध्या चर्चा होतेय.

ऐश्वर्या - अभिषेक
ऐश्वर्या - अभिषेक
मुंबई, 18 डिसेंबर : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर चर्चेत आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक कार्यक्रमात परफॉर्म करून आराध्याने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या क्लिपमध्ये, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लेकीनं तिच्या डायलॉग डिलिव्हरी आणि दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली. आराध्याने तिच्यात तिच्या आईसारखी प्रतिभावान अभिनेत्री बनण्याची क्षमता असल्याचं सिद्ध केलं.आराध्याच एक टॅलेंटेड स्टार कीड असून तिला लवकरच बॉलिवूडमध्ये पाहायचं असल्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. आराध्याचे आजोबा म्हणजे बिग बिंनीसुद्धा आपल्या नातीच कौतुक केलं आहे. पण आता तिच्या आजीची म्हणजे जया बच्चन यांची सध्या चर्चा होतेय.
एकीकडे आराध्याच्या आई बाबांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. पण नुकतेच ऐश्वर्या आणि अभिषेक लेकीला पाठींबा द्यायला एकत्र पोहोचले होते. या दोघांव्यतीरिक्त या कार्यक्रमात ऐश्वर्याची आई वृंदा राय, अभिषेक बच्चन आणि अगस्त्य नंदा देखील उपस्थित होता. पण याचवेळी जया बच्चन, श्वेता बच्चन आणि नव्या नवेली नंदा या कार्यक्रमातून गायब होत्या. याविषयी Reddit वर एक पोस्ट व्हायरल होत आहे.
advertisement
या पोस्टवर नेटिझन्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत. याविषयी बोलताना चाहत्यांनी, 'प्रत्येक कुटुंबात सासू-सासरे नवरा बायकोतील दुराव्याचं कारण बनतात.' असं म्हटलं आहे. तसेच एकानं, 'अगस्त्यच्या चित्रपटाच्या प्रीमियरला ऐश्वर्या गेली होती मग आराध्याच्या कार्यक्रमात श्वेता बच्चन का दिसली नाही असा सवालही उपस्थित केला आहे.
advertisement
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक समारंभात त्यांची नात आराध्या बच्चन हिची कामगिरी पाहून अमिताभ बच्चन यांना आपल्या नातीचा अभिमान वाटला आहे. आराध्या साठी एक पोस्ट शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बिग बींनी या ट्विटमध्ये लिहिले की, 'T 4860 - नातीच्या कामगिरीवर गर्व आणि आनंदी आहे.' बिग बींची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चानी जोर धरला आहे. ऐश्वर्याने लेकीसोबत 'जलसा' हा बंगला सोडून ती तिच्या आईच्या घरी राहायला गेल्याचं बोललं जातंय. पण या जोडप्याने या अफवांवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या दोघांच्यात नक्की काय बिनसलं आहे हे जाणून घेण्याची ओढ चाहत्यांना असून त्यांच्यात सगळं आलबेल असावं अशी प्रार्थनाही ते करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ऐश्वर्या अभिषेक मधील दुराव्याला सासूबाईच जबाबदार? 'या' कारणामुळं ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आल्या जया बच्चन
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement