शाहरूख खानचा डंकी हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. रिलीजआधी शाहरूख वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला. पठाण आणि जवानच्या वेळेसही शाहरूख वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला होता. वैष्णो देवी शाहरूखला पावली असंच म्हणावं लागेल.
हेही वाचा - बस कंडक्टर ते साऊथ सुपरस्टार; रजनीकांत यांचं खरं नाव माहितीये? 'या' कारणामुळे बदलावं लागलं
शाहरूख खान वैष्णो देवी श्राइन बोर्डाचे अधिकारी आणि काही पोलिसांच्या सुरक्षेत वैष्णो देवीच्या मंदिरात पोहोचला. शाहरूखबरोबर यावेळी त्याची मॅनेजच पूजा ददलानी देखील होती. शाहरूख मागील 11 महिन्यात तिसऱ्यांदा वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. यावेळीही शाहरूखनं हुडीनं स्वत:चा चेहरा लपवला होता. पण शाहरूखला ओळखणं त्याच्या चाहत्यांसाठी फार सोपं आहे.
advertisement
राज कुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा सिनेमा 21 डिसेंबरला देशभरात रिलीज होत आहे. शाहरूखच्या आतापर्यंतच्या सिनेमातील हा सर्वात लो बजेट सिनेमा आहे. सिनेमात अँक्शन आणि रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे. शाहरूख बरोबर सिनेमा अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल आणि बोमन इराणी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत.
डंकी सिनेमाच ट्रेलर काही दिवसांआधी रिलीज झालाय. सिनेमातील गाणी देखील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. पठाण आणि जवाननंतर डंकी देखील बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करेल का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. पठाण आणि जवान सिनेमापेक्षा डंकी हा सिनेमा थोडा वेगळा असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाला किती पसंती देत आहेत हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.