नागपूर की दिल्ली, वडापाव की तर्री पोहे?
प्रसाद ओकने गडकरींना त्यांच्या आवडीनिवडीबद्दल काही थेट प्रश्न विचारले, ज्यावर गडकरींनी अत्यंत साधेपणाने आणि स्पष्टपणे उत्तर दिले. यातील पहिला प्रश्न होता, जास्त प्रेम कशावर आहे – नागपूर की दिल्ली?, त्यावर गडकरी यांनी जराही वेळ न दवडता नागपूर असे म्हटले. पुढे प्रसादने विचारलं, वडापाव की तर्री पोहे? त्यावर गडकरी म्हणाले, तर्री पोहे!
advertisement
रस्ते मार्गाने गडकरी सध्या कोणत्या शहरात लवकर पोहोचतात, या प्रश्नावर गडकरी यांचे उत्तर ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रसादने विचारलं, तुम्ही रस्ते मार्गाने दिल्लीला लवकर पोहोचता की मुंबईला? त्यावर गडकरी म्हणाले, आता मुंबईला लवकर पोहोचतो. गडकरींच्या या उत्तरावर प्रसाद ओकने कौतुक करत म्हटले, "काही वर्षांपूर्वी मुंबईला पोहोचणे खूप कठीण होते. पण आता साहेबांमुळे ते सोपे झाले आहे."
सरकारी सेवा आणि 'सफारी'चा किस्सा
प्रश्नमालिकेत पुढे गडकरींच्या वैयक्तिक आवडीनिवडीबद्दलही विचारणा करण्यात आली. प्रसादने विचारले तुमचं जास्त प्रेम कशावर आहे, सिनेमावर की नाटकावर? गडकरींनी उत्तर दिलं, नाटक! शेवटच्या प्रश्नावर मात्र गडकरींनी एक किस्सा सांगून सगळ्यांना हसवले. प्रसाद म्हणाला, तुम्ही सफारी घालणं पसंत करता की ब्लेझर? यावर गडकरी म्हणाले, ब्लेझर! यानंतर हसत हसत गडकरी म्हणाले, "शासकीय सेवेत आजकाल चपरासीसुद्धा सफारी परिधान करतात!" त्यांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खूप दाद दिली.
नितीन गडकरी यांच्या या खास आणि अनौपचारिक संवादाने नागपूरमधील हा सांस्कृतिक महोत्सवाला अधिकच रंगत आली.
