TRENDING:

झीनत अमानसाठी खर्च केली आयुष्याची कमाई, 15 मिनिटात उद्ध्वस्त झाले देव आनंद, असं घडलं तरी काय?

Last Updated:

Dev Anand : देव आनंद हे बॉलिवूडमध्ये त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. पण यांच्या आयुष्यात एक क्षण असा आला की एका चुकीमुळे त्यांच्याकडे असलेलं सर्वकाही १५ मिनिटांत संपलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, जे फक्त अभिनयासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यासाठीही ओळखले जातात. देव आनंद हे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि अदांनी त्यांनी अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. पण, त्यांच्या आयुष्यात असाही एक क्षण आला होता, जेव्हा एका चुकीमुळे त्यांच्याकडे असलेलं सर्वकाही १५ मिनिटांत संपलं. त्यांच्याच पुतण्याने, प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी नुकतंच हा किस्सा सांगितला आहे.
News18
News18
advertisement

शेखर कपूर यांनी ‘फिल्मफेअर’च्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देव आनंद यांच्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, देव आनंद यांनी १९७४ मध्ये ‘इश्क इश्क इश्क’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात शबाना आझमी, झीनत अमान आणि कबीर बेदी असे मोठे कलाकार होते. हा चित्रपट यशस्वी होईल असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःची पूर्ण कमाई यात लावली होती.

advertisement

चित्रपट संपण्याआधीच प्रेक्षकांनी थिएटर सोडला

शेखर कपूर म्हणाले, “मी देव आनंद यांच्यासोबत हॉटेलमध्ये होतो, जिथे चित्रपट पाहिल्यानंतर सगळे फोनवर त्यांचं अभिनंदन करत होते. पण, काही वेळातच सत्य समोर आलं. एका फोन कॉलवर समजलं की, प्रेक्षक चित्रपट संपण्याआधीच थिएटर सोडून जात आहेत.”

शेखर कपूर यांनी सांगितलं की, फक्त १५ मिनिटांत देव आनंदना समजलं की, त्यांचा चित्रपट फ्लॉप झाला आहे आणि त्यांनी लावलेले सगळे पैसे बुडाले आहेत. ते काही वेळ शांत झाले, बाथरूममध्ये गेले आणि बाहेर आल्यावर हसत-हसत म्हणाले, “चल, एक नवा चित्रपट बनवतो. आत्ताच एक नवी कल्पना सुचली आहे.”

advertisement

त्यांच्या या सकारात्मकतेने आणि हार न मानण्याच्या वृत्तीने शेखर कपूर खूपच प्रभावित झाला. देव आनंद यांची ही जिंदादिली आजही अनेकांना प्रेरणा देते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
झीनत अमानसाठी खर्च केली आयुष्याची कमाई, 15 मिनिटात उद्ध्वस्त झाले देव आनंद, असं घडलं तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल