TRENDING:

नोरा, तमन्ना सोडा! 69 व्या वर्षी अभिनेत्रीचा 'रंभा हो'वर राडा; साडी नेसून स्टेजवर केला असा डान्स... तरुणही फिके पडतील

Last Updated:

वयाची ६९ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्रीने एका लग्नसोहळ्यात आपल्या गाजलेल्या 'रंभा हो' गाण्यावर असा काही ठेका धरला की, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: ९० च्या दशकात ज्या अभिनेत्रीच्या एका अदाकारीने आणि डान्सने संपूर्ण बॉलिवूडला वेड लावलं होतं, त्या कल्पना अय्यर आजही त्याच उत्साहात जीवन जगत आहेत, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ आगीसारखा व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. वयाची ६९ वर्षे पूर्ण केलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रीने एका लग्नसोहळ्यात आपल्या गाजलेल्या 'रंभा हो' गाण्यावर असा काही ठेका धरला की, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.
News18
News18
advertisement

साडीतली ती एनर्जी पाहून चाहते थक्क

व्हायरल व्हिडिओमध्ये कल्पना अय्यर एका सुंदर साडीत दिसत आहेत. लग्नाचा स्टेज, लाइट्स आणि बॅकग्राउंडला त्यांचं सर्वात गाजलेलं गाणं 'रंभा हो...' वाजू लागताच कल्पना यांच्यातील ती जुनी डान्सिंग क्वीन जागी झाली. साडी नेसलेली असूनही त्यांच्या डान्स स्टेप्स आणि त्यांची एनर्जी एखाद्या विशीतल्या तरुणीला लाजवेल अशी आहे. गाण्यातील प्रत्येक बीटवर त्यांनी ज्या पद्धतीने ठुमके लावले, ते पाहून इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

advertisement

‘तेव्हा आम्ही खूप घाबरायचो’, गोविंदासोबतच्या अफेअरवर नीलम कोठारी स्पष्टच बोलली

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ

हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आणि काही तासांतच तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कल्पना अय्यर यांच्या उत्साहाला सलाम ठोकला आहे. एका युजरने लिहिलंय, "शरीर कदाचित थकत असेल, पण आत्मा जे शिकला आहे ते कधीच विसरत नाही," तर दुसऱ्याने म्हटलंय, "मॅम, तुमची ही एनर्जी पाहून आम्हाला प्रेरणा मिळतेय!" अनेक चाहत्यांनी त्यांना "एव्हरग्रीन ब्युटी" आणि "रिअल रॉकस्टार" अशा पदव्याही दिल्या आहेत.

advertisement

'आयटम साँग'ची व्याख्या बदलणारी अभिनेत्री

ज्या काळात बॉलीवूडमध्ये डान्सला एका वेगळ्या नजरेतून पाहिलं जायचं, त्या काळात कल्पना अय्यर यांनी 'रंभा हो' आणि 'हरी ओम हरी' सारख्या गाण्यांतून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांचा तोच स्वॅग आणि तीच अदा कायम आहे. हा डान्स केवळ मनोरंजन नाही, तर आपल्या आवडीच्या कलेसाठी वय कधीच अडथळा ठरू शकत नाही, हे सांगणारा एक जिवंत संदेश आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

लग्नातील पाहुण्यांसाठी हा एक अनपेक्षित धक्का होता. प्रत्यक्ष पडद्यावरील अभिनेत्रीला डोळ्यांसमोर नाचताना पाहून अनेकांनी आपले मोबाईल बाहेर काढून हे क्षण कैद केले. कल्पना अय्यर यांनी केवळ डान्सच केला नाही, तर आपल्या ऊर्जेने त्या सोहळ्याची रंगत द्विगुणित केली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
नोरा, तमन्ना सोडा! 69 व्या वर्षी अभिनेत्रीचा 'रंभा हो'वर राडा; साडी नेसून स्टेजवर केला असा डान्स... तरुणही फिके पडतील
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल