नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने त्याचे वडील धर्मेंद्र आणि त्याच्या एका आजाराबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. सनी देओलला असा आजार आहे, त्यामुळे तो अभ्यास करू शकत नाही. आपल्या 40 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने एकदाही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली नाही. सनी देओल लहानपणापासून डिस्लेक्सिया नावाच्या आजाराशी झुंज देत आहे, त्यामुळे त्याने कधीही चित्रपटाच्या स्क्रिप्ट्स वाचल्या नाहीत.
advertisement
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलला विचारण्यात आले की, या वयात आपल्या वडिलांना सेटवर काम करताना पाहून कसे वाटते आणि त्यांची काळजी वाटते का? यावर गदर फेम अभिनेता म्हणाला, 'आम्हाला त्यांची नेहमीच काळजी वाटते. जेव्हा ते शूटिंग करत असतात तेव्हा ते चांगले आहेत का, सगळं ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी मी सेटवर जातो. त्यांनाही माझी काळजी असते. आता मला हे जाणवतं कारण मलाही दोन मुलं आहेत.'
सनी देओलने सांगितले की, तो त्याचे पात्र साकारण्यापूर्वी कोणतेही संशोधन करत नाही. धर्मेंद्र यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, माझे वडील एकापाठोपाठ एक चित्रपट करायचे. ते दोन ते तीन शिफ्टमध्ये काम करायचे. एवढं करूनही त्याने आपली पात्रं सुंदरपणे साकारली. आजच्या काळात कोणीतरी हे करून पहा. आजचे अभिनेते करू शकत नाहीत, कारण ते त्यांचे पात्र साकारण्यापूर्वी अभ्यास करतात. हे सगळं करणं मला मूर्खपणाचं वाटतं, कारण असं करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.'
पुढे आजाराविषयी बोलताना सनी देओल म्हणाला, 'मी डिस्लेक्सिक आहे, त्यामुळे मला नीट लिहिता-वाचता येत नाही आणि ही माझी लहानपणापासूनची समस्या आहे. सुरुवातीला, आम्हाला ते काय आहे हे माहित नव्हते. मी ते अनेक वेळा वाचले आणि त्यांना माझे स्वतःचे बनवले.' असं देखील सांगितलं आहे.
'आपकी अदालत'मध्ये जेव्हा सनी देओलला त्याच्या आजाराबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'मी कधीही स्क्रिप्ट्स वाचत नाही, कारण मला वाचता येत नाही. मी कोणताही संवाद वाचत नाही. 'मी त्यांना अनुभवतो आणि माझ्या भावना व्यक्त करतो. दिग्दर्शक स्क्रिप्ट देतो तेव्हा मी वाचत नाही. मी त्यांना मला काय बोलावायचे आहे ते सांगण्यास सांगतो. मग तो संवाद मी माझ्याच शैलीत बोलतो.' असा खुलासा त्याने केला.सनी पुढे आपला मुद्दा स्पष्ट करत म्हणाला , 'जेव्हा मी संवाद ऐकतो, तेव्हा मला वाचणे सोपे जाते. अशा प्रकारे मी शब्द अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. सनी देओल शेवटी म्हणाला, 'अखेर, संवाद अशा पद्धतीने बोलला पाहिजे की तो संवाद नाही तर मी खरोखर बोलतोय असच वाटलं पाहिजे.'