यंदा संतोष जुवेकरच्या घरी 100 टक्के इकोफ्रेंडली गणपती बाप्पा बसवण्यात आला आहे. आज अभिनेता संतोष जुवेकर याने त्याच्या कळव्यातील घरी परंपरेनुसार गणपती बाप्पा स्थापना केलीये. बाजूने कागदाचं डेकोरेशन बनवण्यात आलं आहे. ज्यामुळे आणखीनच जीव आलाय. संतोषने गणपती बाप्पांसोबत खूप वेगळं कनेक्शन असल्याचंही सांगितली.
ऐन गणपतीत रिंकूच्या साधेपणाने जिंकली मन, चौथा फोटो पाहून पडाल अजूनच प्रेमात
advertisement
न्युज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोष जुवेकर म्हणाला, गणपती येण्याअगोदर कामाला सुरुवात होते, घराची साफ सफाई असेल, डेकोरेशन अशी सुरुवात होते. प्रत्येक वेळेला बाप्पा सोबत असतो. बापाचा आशिर्वाद आणि आई वडिलांचा आशिर्वादाने कामाच्या संधी मिळत असतात त्या अशाच मिळत राहो.
संतोष जुवेकरने सगळ्यांसाठी साकडं मागितलं, सगळ्यांना सुखी ठेव, सकारात्मकता जास्त वाढू दे, आदर असू दे. चांगल्या गोष्टीची जाणीव सगळ्यांना असूदेत. यावेळी संतोष मराठी इंडस्ट्रीविषयीदेखील बोलला. "मराठी इंडस्ट्रीची साऊथ आणि हिंदी सारखी वाढ होऊ दे. मराठीला दर्जा आहेच पण मराठी इंडस्ट्रीला ज्या गोष्टी गरज आहे ती पूर्ण होऊ दे."