प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हा भावनिक खुलासा केला. प्रियदर्शन यांनी त्यांच्या अनेक हिट हिंदी चित्रपटांमध्ये असरानींसोबत काम केले आहे. प्रियदर्शन म्हणाले, "मी कॉलेजच्या दिवसांपासून असरानींचे चित्रपट पाहत आलो आहे. त्यांनी कधीही दिखावा केला नाही, पण लोकांना खळखळून हसवले."
advertisement
प्रियदर्शन यांनी सांगितले की, असरानी फक्त कॉमेडियन नव्हते, तर ते एक महान अभिनेते होते. 'कोशिश' मध्ये त्यांनी व्हिलनची भूमिका केली, तर 'अभिमान' मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या समोर जबरदस्त अभिनय केला. त्यांनी सांगितले, "अक्षय कुमारने मला दोन वेळा फोन केला. अक्षय म्हणाला की, त्याला डिप्रेशनमध्ये असल्यासारखे वाटत आहे. कारण, गेल्या ४०-४५ दिवसांपासून तो असरानींसोबत सलग दोन चित्रपटांचे शूटिंग करत होता."
'त्या' दोन चित्रपटांमुळे बॉण्डिंग वाढले
असरानी यांच्या निधनापूर्वी अक्षय कुमार त्यांच्यासोबत दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याच 'हैवान' आणि 'भूत बंगला' या दोन आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करत होते. या दोन चित्रपटांच्या सेटवर असरानी आणि अक्षय यांनी एकत्र वेळ घालवला. प्रियदर्शन यांनी असेही सांगितले की, असरानी नेहमी अक्षयला आणि राजपाल यादवलाही सल्ला देत असत. ते आपल्या आयुष्यातील चुकांबद्दल सांगून, त्यांनी त्या करू नयेत, असे शिकवत असत.
"आठवड्याभरापूर्वीच मिठी मारली होती!"
अक्षय कुमार आणि असरानी यांनी यापूर्वीही 'खट्टा मीठा', 'भागम भाग', 'दे दना दन', 'वेलकम' अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. असरानी यांच्या निधनाची बातमी समजताच अक्षयनेही सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती.
अक्षयने लिहिले होते, "असरानीजींच्या निधनाची बातमी ऐकून स्तब्ध झालो आहे. अवघ्या एका आठवड्यापूर्वीच 'हैवान'च्या शूटिंगवर भेट झाली होती आणि आम्ही एकमेकांना खूप प्रेमाने मिठी मारली होती. त्यांची कॉमिक टायमिंग खरंच लाजवाब होती. ही इंडस्ट्रीसाठी खूप मोठी हानी आहे. असरानी सर, तुम्ही आम्हाला हसण्याचे लाखो कारणे दिली, देव तुमच्या आत्म्याला शांती देवो."