काय आहे कथानक?
हॉरर चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णु सासी शंकर यांनी केलं आहे आणि कथा अभिलाष पिल्लई यांनी लिहिलेली आहे. या चित्रपटात अर्जुन अशोकन, गोकुल सुरेश, सैजू कुरुप, बालू वर्गीज, मालविका मनोज आणि शिवदा हे कलाकार झळकले आहेत. 1 ऑगस्ट 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पुढे 26 सप्टेंबरला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचं नाव आहे “सुमती वलावु”. या मलयाळम चित्रपटाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याची कथा. केरळमधील थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मायलमूडू गावातल्या “सुमती वलावु” नावाच्या वळणाशी संबंधित या चित्रपटाचं कथानक आहे. असं म्हणतात की 1950 च्या दशकात तिथे सुमती नावाच्या एका गर्भवती महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. तेव्हापासून ती जागा भूताटकी समजली जाते. चित्रपटात दाखवले आहे की काही लोक त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथे घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा सामना करतात, ज्या सुमतीच्या आत्म्याची खरी कहाणी उलगडतात.
advertisement
लोकप्रिय गायक वयाच्या 50 व्या वर्षी करणार दुसरं लग्न; 16 वर्षांनी लहान गायिकेसोबत थाटणार संसार
विशेष म्हणजे “सुमती वलावु” या चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ज्याचा अंदाज याच्या कमाईवरून लावता येतो. “सुमती वलावु” 2025 मधील 9वा सर्वाधिक कमाई करणारा मलयाळम चित्रपट ठरला आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.8/10 अशी रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, भीती आणि विनोद यांचा संगम प्रेक्षकांनी खूपच पसंत केला. लोकांना हा चित्रपट यासाठी आवडला, कारण यात फक्त भीतीच नाही, तर भावना आणि मनोरंजन यांचा सुंदर समतोल आहे.