चित्रपट रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षकांचे रिव्ह्यूज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रेक्षकांनी विशेषतः क्लायमॅक्सचं कौतुक केलं आहे. अनेक जण म्हणत आहेत की, 'हा इंडस्ट्रीत पाहिलेला सर्वोत्तम क्लायमॅक्स आहे.'
हॉरर, सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका! पाहा नेटफ्लिक्सवरील 5 बेस्ट हॉरर वेब सिरीज
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा चॅप्टर 1' हा केवळ 'कांतारा' (2022) या सुपरहिट चित्रपटाचा प्रीक्वल नाही, तर त्या लोककथेच्या मुळाशी घेऊन जाणारा एक भव्य आणि चित्तथरारक अनुभव आहे. पहिल्या भागाचे यश पाहता, 'चॅप्टर 1' कडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.
advertisement
पहिल्या भागाप्रमाणेच ऋषभ शेट्टीने या चित्रपटात लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी भूमिका साकारली आहे. त्याच्या दिग्दर्शनाची पकड तीव्र आणि दूरदृष्टीची आहे. हा चित्रपट बनवताना त्याने या कथेत जीव ओतल्याचे स्पष्टपणे जाणवते. एका प्रेक्षकाने लिहिलं, “हा अनुभव फक्त चित्रपटगृहातच घेता येईल. ऋषभ शेट्टीचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्हीही अप्रतिम आहेत. कथा, संगीत आणि कॅमेरावर्क त्याला वेगळ्याच उंचीवर नेतात.”
एका युजरने तर लिहिलं, "ऋषभ शेट्टीला पुन्हा एकदा नॅशनल अवॉर्ड मिळणार यात शंका नाही." आणखी एका प्रेक्षकाने सांगितलं, “कथा, लोककथा, श्रद्धा आणि मानवी भावना यांचं सुंदर मिश्रण या सिनेमात आहे." 'कांतारा चॅप्टर 1' चा कॅनव्हास पहिल्या भागापेक्षा खूप मोठा आणि भव्य आहे. 125 कोटींच्या मोठ्या बजेटमुळे व्हिज्युअल्स (Visuals) आणि सेट्स (Sets) अधिक प्रभावी झाले आहेत.
रुक्मिणी वसंत (कनकवती) आणि जयराम यांनी उत्कृष्ट साथ दिली आहे. खलनायकाच्या भूमिकेतील गुलशन देवैयाह देखील प्रभावी ठरला आहे. अनेक रिव्ह्यूनुसार, चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास किंवा क्लायमॅक्स हा थरारक, भावनिक आणि व्हिज्युअली अद्भुत आहे.