Netflix: हॉरर, सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका! पाहा नेटफ्लिक्सवरील 5 बेस्ट हॉरर वेब सिरीज

Last Updated:

Netflix:तुम्हाला अंगावर काटा आणणाऱ्या, हृदयाची धडधड वाढवणाऱ्या हॉरर वेब सिरीज पाहायला आवडत असतील, तर नेटफ्लिक्स तुमच्यासाठी खजिना आहे.

नेटफ्लिक्सवरील 5 बेस्ट हॉरर वेब सिरीज!
नेटफ्लिक्सवरील 5 बेस्ट हॉरर वेब सिरीज!
मुंबई : नेटफ्लिक्स म्हणजे मनोरंजनाचा महासागर. रोमँटिक, अॅक्शन, कॉमेडी सगळं काही इथे मिळतं. पण जर तुम्हाला अंगावर काटा आणणाऱ्या, हृदयाची धडधड वाढवणाऱ्या हॉरर वेब सिरीज पाहायला आवडत असतील, तर नेटफ्लिक्स तुमच्यासाठी खजिना आहे. काही सिरीज इतक्या लोकप्रिय झाल्या की त्यांचे अनेक सीझन आले, तर काहींना आजवरच्या सर्वात भयानक मालिकांचा किताब मिळाला.
चला पाहूया अशा काही टॉप हॉरर वेब सिरीज ज्या नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हव्यात.
घोल (Ghoul)
राधिका आपटेच्या दमदार अभिनयामुळे ही मालिका आजही चर्चेत आहे. अरब लोककथांवर आधारित ही सिरीज भयानक वातावरण निर्माण करते. 2018 मध्ये आलेली ही मालिका फक्त तीन एपिसोड्सची असली तरी तिचा प्रभाव प्रचंड आहे. IMDb वर 7 रेटिंग मिळवणारी ही नेटफ्लिक्सची पहिली भारतीय हॉरर मिनी सिरीज होती.
advertisement
टाइपराइटर (Typewriter)
सुजॉय घोष दिग्दर्शित ही मालिका गोव्यातील झपाटलेल्या घराभोवती फिरते. घर, पुस्तक आणि भूत या तिन्हींच्या संगमातून जन्माला आलेली ही मालिका हॉरर चाहत्यांसाठी ट्रीट आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेली ही सिरीज पाहताना प्रेक्षकांनी अनेकदा अंगावर काटा आल्याचे मान्य केले आहे.
द हॉंटिंग ऑफ हिल हाऊस (The Haunting of Hill House)
8.5 IMDb रेटिंग असलेली ही मालिका हॉरर जगतातील क्लासिक मानली जाते. पाच मुलं, त्यांचं जुनी हवेली आणि तिथल्या अलौकिक घटना या कथेतले ट्विस्ट प्रेक्षकांना हादरवून सोडतात. 2018 मध्ये आलेली ही सिरीज केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात सुपरहिट ठरली.
advertisement
द एक्सॉर्सिस्ट (The Exorcist)
1973 मध्ये प्रदर्शित झालेला हा हॉरर क्लासिक अजूनही लोकांना घाबरवतो. एका तरुणीला भूत पछाडते आणि दोन पुजारी तिचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात. या कथेतले दृश्य इतके भीतीदायक आहेत की प्रेक्षकांनी थिएटर सोडल्याचे किस्से आजही सांगितले जातात. IMDb रेटिंग 8.1 असलेला हा चित्रपट आणि त्यावर आधारित मालिका आजही बेस्ट हॉरर कंटेंटमध्ये गणली जाते.
advertisement
वेन्स्डे (Wednesday)
अलौकिक शक्ती असलेली वेन्स्डे अॅडम्स या पात्राभोवती फिरणारी ही मालिका 2022 पासून चर्चेत आहे. 2025 मध्ये आलेल्या तिच्या दुसऱ्या सीझनला IMDb वर 8 रेटिंग मिळाले. रहस्य, हॉरर आणि डार्क ह्यूमरची मजा घ्यायची असेल तर ही मालिका नक्कीच पाहा.
द वॉकिंग डेड (The Walking Dead)
झॉम्बी-हॉररचा फॅन असेल तर ही मालिका मिस करूच नका. 11 सीझन आणि तब्बल 177 एपिसोड्स असलेली ही सिरीज म्हणजे हॉरर आणि सर्व्हायवल ड्रामाचा अद्भुत मिलाफ आहे. 8.1 IMDb रेटिंग असलेली ही मालिका जगभरात लाखो चाहत्यांची फेव्हरेट आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Netflix: हॉरर, सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका! पाहा नेटफ्लिक्सवरील 5 बेस्ट हॉरर वेब सिरीज
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement