मन्नत सोडून शाहरुख राहतोय भाड्याच्या घरात
शाहरुख खान त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटण्याची परंपरा दरवर्षी जपतो. यावर्षी त्याचा बंगला रिनोव्हेट होत असल्याने तो त्याच परिसरात भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहायला गेला आहे. यावर एका चाहत्याने गमतीत प्रश्न विचारला की, तो वाढदिवसासाठी मुंबईत आला आहे, पण त्याला हॉटेलमध्ये रूम मिळाली नाही, तर तो मन्नतमध्ये राहू शकतो का?
advertisement
यावर शाहरुखने जे उत्तर दिले, त्याने चाहत्यांना हसून अक्षरशः लोटपोट केले. शाहरुख म्हणाला, "मन्नतमध्ये तर माझ्याकडेही रूम नाहीये आजकाल.... मीच भाड्यावर राहतोय!!!"
हार्ड हॅट घालून चाहत्यांना भेटण्याची तयारी!
रिनोव्हेशनमुळे तो यावर्षी चाहत्यांना भेटणार की नाही, असा प्रश्न अनेकांना होता. आपल्या ट्रेडमार्क विनोदासह शाहरुखने यावर उत्तर दिले, "नक्कीच भेटणार! पण भेटीच्या वेळी 'हार्ड हॅट' घालावी लागू शकते." शाहरुखच्या या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला.
एका चाहत्याने विचारले की, 'तुम्ही आता मुलाखती का देत नाही? आम्हाला तुमच्या विचारांची आठवण येते.' यावर शाहरुखने आपल्या खास अंदाजात उत्तर दिले, "माझ्याकडे काही नवीन सांगण्यासारखं नाहीये... आणि जुन्या मुलाखती चांगल्याच जुन्या झाल्या आहेत, त्यामुळे... हा हा!"
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि सुहाना खान व अभिषेक बच्चनसोबत काम करत असलेल्या त्याच्या 'किंग' या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला, "आम्ही अजून टायटल अधिकृतपणे जाहीर केले नाहीये, आणि तुम्ही थेट टीझरवर कसे पोहोचलात!!!"
आयुष्यातील प्राधान्यक्रम
या सर्व गमती-जमतीच्या दरम्यान, एका चाहत्याने 'या टप्प्यावर तुमचे प्राधान्यक्रम काय आहेत?' असा भावनिक प्रश्न विचारला. यावर शाहरुखने अतिशय विचारपूर्वक उत्तर दिले, ज्यामुळे त्याचे खाजगी आयुष्य आणि विचारांची झलक मिळाली. तो म्हणाला, "माझ्या मुलांसोबत वेळ घालवणे... तसेच, लोकांना मनोरंजन करण्यासाठी टफ आणि हेल्दी राहणे... आणि सामान्यपणे अधिक सहनशील आणि प्रेमळ असणे."
