मोहम्मद सिराजने पाठवला खास संदेश
'रोडीज' आणि 'स्प्लिट्सविला' फेम बसीर अलीला सध्या केवळ चाहत्यांकडूनच नव्हे, तर हैदराबादचा स्टार क्रिकेटपटू मोहम्मद सिराजकडूनही मोठे समर्थन मिळाले आहे. सिराजने बसीरसाठी इन्स्टाग्रामवर पाठवलेला एक लहान पण भावनिक संदेश सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
बसीर अलीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर नुकताच एक रील पोस्ट करण्यात आला होता. या क्लिपमध्ये बसीर शोमध्ये अमाल मलिकशी बोलताना सिराजचे कौतुक करताना दिसतो. तो म्हणतो, "आपला मोहम्मद सिराज, यार, मला तो खूप आवडतो. त्याच्यासाठी माझ्या मनात खूप आदर आहे! आम्ही दोघांनीही जवळपास एकाच वेळी, हैदराबादमधूनच आमच्या करिअरची सुरुवात केली."
बसीर अलीच्या रीलवर सिराजची स्पेशल कमेंट
या रीलवर खुद्द मोहम्मद सिराजने कमेंट केली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिराजने लिहिले आहे, "लव्ह यू ब्रो, ट्रॉफी घेऊनच यायचं आहे." या दोघांमधील हे इमोशनल नातं पाहून चाहते बसीरसाठी आणखी जोशात चीअर करत आहेत.
दरम्यान, बसीर अलीने शोमध्ये एक मोठा माईलस्टोन गाठला आहे. 'We Watch BB for Baseer' हा हॅशटॅग 'X' वर मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाला असून, १ मिलियन हॅशटॅग मिळवणारा तो 'बिग बॉस १९'चा पहिला स्पर्धक बनला आहे! बसीरच्या या यशामागे त्याचे नैसर्गिक वागणे आणि स्पष्टवक्तेपणा असल्याचे मानले जात आहे.