TRENDING:

अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार

Last Updated:

Ajintha Verul Film Festival: अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन झाले. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ लेखिका, नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या 10 व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच झाले. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. प्रसिध्द लेखिका, नाटककार, निर्मात्या व चित्रपट दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. भारतीय सिनेमातील अतुल्य योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते पैठणीचा शेला, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि 2 लक्ष रुपये देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार
अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार
advertisement

पद्मभूषण सई परांजपे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. “सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुणे - मुंबईतच घडू शकतात असे नाही, हे अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दाखवून दिले आहे. विशेषत : मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर करण्याचे काम या महोत्सवाने केले,” असे परांजपे म्हणाल्या. यावेळी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

advertisement

प्रेमासाठी कायपण! आंतरजातीय विवाहासाठी कुटुंबीयांची ‘ती’ अट, इंजिनिअर जोडप्यानं करून दाखवलं!

सई परांजपे म्हणाल्या..

पुढे बोलताना पद्मभूषण सई परांजपे म्हणाल्या की, “आज इथे बोलत असताना नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढेच म्हणते की, आजवर मी केलेल्या कामाची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा आणि सुंदर असा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार’ सन्मान देऊ केला. त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झालेला असून मराठवाड्यामधल्या रसिकाला खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे.”

advertisement

मराठी सिनेमाला 100 कोटींचे अनुदान

यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, चित्रपट हे महत्त्वपूर्ण क्षेत्र असून भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्ट पॉवर म्हणून सिनेमा काम करत असतो. महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे. या माध्यमातून आपल्याला भारतीय सिनेमासह आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता येतात. अशा महोत्सवात सेलिब्रेटी, क्रिएटिव्हिटी आणि कॉमर्स हे तीन सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. चित्रपट बनविणाऱ्या मंडळींना महाराष्ट्र शासन कायम सहकार्य करीत आले असून अनेक प्रोत्साहानपर योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरवर्षी मराठी सिनेमाला महाराष्ट्र शासनाच्यावतीने 100 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.

advertisement

दिग्ददर्शक आयोजकांच्या भूमिकेत

एका छोट्या शहरात सुरू झालेला हा महोत्सव आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा एकमेव असा महोत्सव असेल ज्यामधे दिग्दर्शक आयोजकांच्या भूमिकेत आहेत. हा महोत्सव रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना शिक्षित करत प्रेरणा देण्याचे काम करत असल्याचे महोत्सवाचे मानद अध्यक्ष व प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी सांगितले.

advertisement

शतकापूर्वीचा कालिया मर्दन मूकपट

दरम्यान, उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर  यावर्षीची जागतिक पातळीवरील नावाजलेली फ्रेंच आणि तामिळ भाषेतील फिल्म 'लिटील जाफना' ही फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून प्रदर्शित करण्यात आली. तर भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी 105 वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिध्द मुकपट ‘कालिया मर्दन’ याचे विशेष प्रदर्शन उद्घाटन सोहळ्याआधी दाखविण्यात आला. 100 वर्षांपूर्वीचा मुकपट प्रत्यक्ष संगीताद्वारे रसिकांना अनुभवता यावा म्हणून कालिया मर्दन हा मुकपट कोलकाता येथील सतब्दीर सब्द या वाद्यवृंद समूहातर्फे सादरीकरणाद्वारे दाखविला गेला. या समूहामध्ये सात्यकी बॅनर्जी, सुचल चक्रवर्ती, तीर्थंकर बॅनर्जी, सुमंत्र गुहा, सौमाल्य सरेश्वरी, अरुणभा गुप्ता, दिव्यकमल मित्र आणि स्वरूप मुखर्जी आदि कलाकारांचा समावेश होता.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन; सई परांजपेंना जीवनगौरव पुरस्कार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल