advertisement

30 व्या वर्षी लग्नाआधीच बनली आई, आता 36 वर्षांनी अभिनेत्री दुसऱ्या बाळाला जन्म देणार? म्हणते, 'हेच हवं होतं'

Last Updated:

Bollywood Actress: कार्यक्रमातील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू केल्या.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडची बिनधास्त आणि रोखठोक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता सध्या एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या ग्रँड वेडिंग रिसेप्शनमध्ये नीना गुप्तांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी चक्क त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा सुरू केल्या. ६६ व्या वर्षी नीना गुप्ता पुन्हा आई होणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आता यावर खुद्द नीना गुप्ता यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
आपल्या प्रेग्नेंसीच्या अफवा ऐकून नीना गुप्तांना हसू आवरलं नाही. 'बॉलिवूड हंगामा'शी बोलताना त्या म्हणाल्या, "आता मला एवढंच पाहायचं बाकी होतं. ही तर खरीखुरी 'बधाई हो' झाली असती!" नीना यांनी स्पष्ट केलं की त्या प्रेग्नेंट नाहीत. त्यांनी सांगितलं की, त्या दिवशी त्यांनी परिधान केलेल्या साडीचं कापड खूप जाड होतं, ज्यामुळे त्यांचा लूक थोडा बल्की वाटत होता. साडीच्या त्या विशिष्ट ड्रेपिंगमुळे लोकांना बेबी बंपचा भास झाला असावा.
advertisement
advertisement
गंमतीचा भाग बाजूला ठेवून नीना गुप्ता यांनी या अफवांकडे सकारात्मकतेने पाहिलं आहे. त्या म्हणाल्या, "माझ्या या वयात लोक माझ्या प्रेग्नेंसीची चर्चा करतायत, हे पाहून मला खूप आनंद झाला. याचा अर्थ असा की आपण एक राष्ट्र म्हणून विकसित होतोय आणि जुन्या विचारांच्या बेड्या तोडतोय. ६६ व्या वर्षीही आई होण्याबद्दल लोक विचार करू शकतात, हे बदलाचं लक्षण आहे."
advertisement

मसाबाच्या साडीतली ती रॉयल एन्ट्री

हैदराबादमध्ये झालेल्या या रिसेप्शनमध्ये नीना गुप्ता आपली कन्या, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने डिझाइन केलेली आयवरी रंगाची साडी नेसून पोहोचल्या होत्या. या साडीसोबत त्यांनी घातलेला हॉल्टर नेक ब्लाउज आणि पारंपरिक दागिने यामुळे त्या खूपच सुंदर दिसत होत्या. पण याच ग्लॅमरस लूकने चाहत्यांना गोंधळात पाडलं आणि बघता बघता त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Neena Gupta (@neena_gupta)



advertisement
८० च्या दशकात वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्यासोबतच्या नात्यातून मसाबाचा जन्म झाला, तेव्हा समाजाने नीना यांच्यावर प्रचंड टीका केली होती. पण कोणाचीही पर्वा न करता त्यांनी सिंगल मदर म्हणून मसाबाचा सांभाळ केला. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्याशी लग्न करून नव्या आयुष्याला सुरूवात केली.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
30 व्या वर्षी लग्नाआधीच बनली आई, आता 36 वर्षांनी अभिनेत्री दुसऱ्या बाळाला जन्म देणार? म्हणते, 'हेच हवं होतं'
Next Article
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग', आता एक चूक जगाचा पाया हलवणार
इराणने केला महाभयंकर प्रकार, युद्धात मोठी उलथापालथ; होर्मुझमध्ये पेरल्या 'समुद्री सुरुंग'
  • इराणचा सर्वात मोठा जुगार

  • पेट्रोल-डिझेलसाठी हाहाकार माजणार

  • जागतिक तेल पुरवठा ठप्प होण्याची भीती

View All
advertisement